मुंबई APMC मसाला मार्केट संचालकांच्या आशीर्वादाने उघडपणे चालतो खाद्यतेलाच्या भेसळ.
मुंबई APMC मसाला मार्केट संचालकांच्या आशीर्वादाने उघडपणे चालतो खाद्यतेलाच्या भेसळ.  
दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाचं भेसळ
नवी मुंबई: दिवाळीच्या तोंडावर ठाणेच्या (Thane )अन्न व औषध प्रशासन विभागाने (Department of Food and Drug Administration) भली मोठी कारवाई केली असून मुंबई APMC मसाला मार्केटच्या L ४९ या   खाद्यतेलाच्या गोडाऊनवर छापा टाकत ३७ लाख १० हजार १८६   रुपयांचा २३ हजार ५४७ किलोग्रॅम खाद्यतेलच्या   साठा जप्त केला आहे. त्यामुळे   भेसळयुक्त खाद्य पदार्थ (Adulterated food) विकणाऱ्यांवर पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.सूत्राने सांगितले प्रमाणे असे भेसळयुक्त खाद्यतेलाच्या व्यापार   करणाऱ्यावर मार्केट संचालकच्या आशीर्वाद आहे त्यामुळे मार्केट मध्ये असे   वऱ्याच ठिकाणी खाद्यतेलाच्या भेसळ उघडपणे   केला जात आहे त्यामुळे   मार्केट संचालक यांनी भेसळयुक्त खाद्यतेल बिक्रीतून नागरिकांची आरोग्याशी खेळ करत आहे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी बाजार घटक करत आहे.
सणासुदीच्या अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने त्यात भेसळ होण्याची, तसेच अन्न पदार्थांची गुणवत्ता घसरण्याची भीती अधिक असते. दिवाळीच्या सणात प्रामुख्याने सामान्य जनतेला भेसळमुक्त सकस आणि चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली. याच पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर रोजी मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये L- 49   मेसर्स शिवशक्ती एंटरप्राईजेस या खाद्यतेल उत्पादक येथे केलेल्या कारवाई करण्यात आली आहे . तपासणीत ३७ लाख १० हजार १८६ रुपये किमतीचा २३ हजार ५४७ किलोग्रॅम रिफाइंड सोयाबीन तेल, काळात रिफाइंड पामोलिन तेल, रिफाइंड राईस ब्रँड तेल व रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल असा खाद्यतेलाचा साठा जप्त केला.   खाद्यतेलाचे नमुने सध्या तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून   विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून त्या अंतर्गत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याचे माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कोकण विभागीय सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.
१. अन्न व्यवसायिकाचे नाव पत्ता: भरत रणछोडदास ठक्कर. मालक. मेसर्स शिवशक्ती इंटरप्राईजेस, प्लॉट नंबर एल-49, मुंबई APMC   मसाला मार्केट  
२.   व्यवसायाचा प्रकार: खाद्यतेल रिपेकर
३. जप्त करण्यात आलेल्या खाद्यतेलाचा तपशील:
- रिफाइंड सोयाबीन ऑइल (टॅंक नंबर एक). वजन: 998.4 किलोग्रॅम किंमत रुपये १,२९,७९२/-
- रिफाइंड राईस ब्रँड ऑइल (टँक नंबर दोन) वजन: 2998.4 किलोग्रॅम 
किंमत: रुपये ३,७४,८००/- - रिफाइंड पामोलीन तेल (टॅंक नंबर तीन) वजन- 9998.4 किलो 
किंमत रुपये 10,99,824/- - रिफाइंड पामोलीन तेल (टॅंक नंबर चार) वजन- 9498.4 किलो 
किंमत रुपये 10,44,824/- - रिफाईंड राईस ब्रान ऑइल (टाकी नंबर- 5), वजन - 4498.4 किलो 
किंमत रुपये 5,62,300/- - आरबीडी पामोलीन ऑइल (15 लिटरचे   148डबे) वजन- 2020.2 किलो किंमत-रुपये 2,22,222/-
- आर बी डी पामोलिन ऑइल (15 किलो चे 58 डबे) वजन -864.4 किलोग्रॅम किंमत -रुपये 95,524/-
- रिफाइंडजिम सनफ्लावर ऑइल (जेमलाईट) एक लिटर वजनाचे 1220 पाऊच. किंमत -रुपये 1,80,900/-
जप्तीचे कारण -  भेसळ -कमी दर्जाचा असलेल्या बाबतचा संशय. खाद्यतेलाच्या पॅकिंग करता एकदा उपयोगात आणलेल्या डब्यांचाच पुनर्वापर. 
उत्पादकाकडे स्वतःची अद्यावत प्रयोगशाळा नसणे.