मुंबई APMC भाजीपाला ,फळ मार्केट संचालकांकडून आपल्या गाळेवर अनधिकृत बांधकाम!
मुंबई APMC भाजीपाला ,फळ मार्केट संचालकांकडून आपल्या गाळेवर अनधिकृत बांधकाम!
मुंबई APMC भाजीपाला व फळ मार्केटच्या दुरव्यवस्थेला स्वतः व्यापारी जबाबदार!
भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये जवळपास २००० अनधिकृत बांधकाम
मार्केटमध्ये जवळपास ८० टक्के वयापारी आपल्या गाळे दिले भाडेतत्वावर
भाजीपाला आणि फळ मार्केटचे रूपांतर धर्मशाळेत
भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये FSI मंजूर नसताना बांधकाम करण्यात आले.
APMC प्रशासनाकडून NMMCला पत्र देउन सुद्धा कारवाई नाही.
पेड्यावर अनधिकृतपणे वास्तव करणाऱ्या लोकांमुळे बाजार आवारात घाणीचे साम्राज्य.
या लोकांमुळे बाजार समितीला होत आहे मोठा प्रमाणात आर्थिक नुकसान.
जे काम स्वतः व्यापाऱ्यांनी केल पाहिजे त्या कामाचं ओझं APMC प्रशासन वाहत आहे.
सभापती आणि संचालक मंडळ येऊन ३ वर्ष झाली मात्र कुठल्याही निर्णय नाही, त्यामुळे बाजारघटक म्हणतात संचालक GO BACK!
Apmc News Network
नवी मुंबई : नवी मुंबईतील बोनकोडे येथे नुकतीच इमारती ढासळण्याची घटना घडली होती त्यामुळे अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई APMC भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये देखील २००० हजार गाळ्यावर व्यपाऱ्याने अनधिकृत बांधकाम केले आहे याची तक्रार स्वतः बाजार समितीने केली असून महापालिकाने आता पर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे बाजार आवारात कोणतीही दुर्घटना घडली तर त्यासाठी व्यापारी स्वतः जबाबदार असतील त्याचे कारण या व्यपार्याकडून गळ्याच्या पेढ्यावर अनधिकृत बांधकाम करून भाडे तत्वावर देण्यात आले आहे,मार्केटमध्ये जवळ्पास ८० टक्के व्यापारी स्वतः व्यापार करत नाही आपले गाळे भाड्याने देउन लाखो रुपयांची वसुली करतात . भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये FSI मंजूर नसताना बांधकाम करण्यात आले आहे. महापालिका या गाळाधारकावर कारवाई करत नाहीं आणि आमच्या गावात कारवाई करतात तर असा भेदभाव का ? यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त नेते निलेश पाटील यांनी केली आहे.
मुंबई APMC प्रशासनाने १९९० साली भाजीपाला व फळ मार्केटची उभारणी केली, सगळे व्यापार व्यवस्थित सुरु होता मात्र काही व्यापारी प्रतिनिधी यांनी मार्केट मध्ये अनधिकृत बांधकाम सुरु केला ते पाहून इत्तर व्यपाऱ्याने बांधकाम केले,आपल्या गालावर अनधिकृत बांधकाम करून त्या बांधकाम मध्ये अनधिकृपने लोकांना वास्तव करण्यासाठी भाड्याने दिले . त्यामुळे बाजार आवारात अनधिकृत व्यापार आणि अनधिकृतपणे भाडेतत्त्वावर देउन लाखो रुपये व्व्यपाऱ्याने कमवतात,मात्र दुरुस्तीच्या काम बाजार समिती कडून केला जात आहे यामध्ये नक्की फायदा कोणाचा आहे ? या धर्मशाळामध्ये राहणारे सर्व लोक बाहेरचे असून या लोकांकडून भाडे घेतले जात आहे आणि दुरुस्तीच्या नावाने लाखो रुपये टेंडर काढून बाजार समितीच्या तिजोरीवर डल्ला मारण्याच्या प्रकार काही संचालक करत आहे . आता पर्यंत दोन्ही मार्केटचे देखभालदुरुस्ती साठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. बाजारात देखभाल, रंगरंगोटी, दुरुस्ती करण्यात काम प्रशासन करणार, आणि व्यपाऱ्याने अनधिकृत व्यापार ,अनधिकृत बांधकाम करून आपले गाळे भाडेवर देउन भाडे वसुली करणार ये काय चालले मुंबई APMC मार्केटमध्ये . व्यपाऱ्याने आपले गाळे भाडेतत्वावर देउन भाडे वसुली करतात तर देखभाल आणि दुरुस्ती स्वतः व्यापारी का करत नाही असा प्रश्न बाजार घटकांकडून उपस्तित केला जात आहे . मुंबई एपीएमसीचे संचालक मंडळ,प्रशासन याना सोबत घेऊन प्रत्येक बाजार आवारात पाहणी दौरा केला पण पाहणी दौरा नंतर ३ वर्ष झाले तरीही काम शून्य ? नवीन आलेले सचिव राजेश भुसारी याना सध्या मार्केटचे पूर्ण स्थिती माहिती नाही , या सगळ्या कामकाजाची माहिती करून घायला काही वेळ लागणार मात्र सचिवाला आपल्या बाजूने करण्यासाठी आणि डागडुजीसाठी काढण्यात आलेल्या निविदा कामाची मंजूर करण्यासाठी काहींनी प्रयत्न चालू केल्याचे समजते .काही संचालक बाजार आवारात आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना सोबत घेवून मार्केटमध्ये डागडुजी आणि इत्तर कामंसाठी लॉबी सुरु केली आहे त्यामुळे नवीन सचिव राजेश भुसारी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्व बाजारघटकाचे लक्ष्य लागले आहे.
भाजीपाला आणि फळ मार्केटचे संचालक स्वतः आपल्या गाळ्यावर अनधिकृत बांधकाम केल्याने इतर व्यपाऱ्याने बिनधास्तपणे बांधकाम केला आणि मार्केटमध्ये अनधिकृत व्यापार जोरात सुरु होऊन भाजीपाला आणि फळ मार्केटचे रूपांतर धर्मशाळेत झाले आहे . व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्यावर अनधिकृत बांधकाम, व्यापार करतात त्यामुळं बाजार समितीला मोठा प्रमाणे आर्थिक नुकसान होत आहे . पेड्यावर अनधिकृतपाने वास्तव करणाऱ्या लोकांमुळे बाजार आवारात घाणीचे साम्राज्य झाली आहे जे काम स्वतः व्यापाऱ्यांनी केल पाहिजे त्या कामाचं ओझं APMC प्रशासन वाहत असल्याचे दिसून येत आहे . डागडुजीच्या नावाखाली काही वयापारी आपल्या गाळ्यांचे काम करून घेतात त्यामुळे जो पर्यंत हे अनधिकृत व्यापार आणि बांधकाम बंद होत नाही तो पर्यंत APMC प्रशासन भाजीपाला आणि फळ मार्केट मध्ये गाळे दुरुस्तीचे काम करू नये ,या बांधकामामुळे मार्केटची दुर्व्यवस्था झाली आहे अशी माहिती आरटीआय ऍक्टिविस्ट अनर्जित चव्हाण यांनी दिली आहे .