मुंबई APMC भाजीपाला मार्केटच्या कारभार उप सचिव ऐवजी सुरक्षा रक्षकचा हातात!
मुंबई APMC भाजीपाला मार्केटच्या   कारभार उप सचिव ऐवजी सुरक्षा रक्षकचा हातात!
शेतकरी भावांनो, तुम्हीच खरी देशाची संपत्ती आहात. तुमचा जीव झाडाला टांगण्याएवढा स्वस्त नाही. शेतकऱ्यानं आत्महत्या   केल्याचं ऐकून मी कासावीस होतो. माझ्याच घरातलं कुणी गमावलंय अशी भावना निर्माण होते, अशा शब्दात राज्यातील शेतकरी आत्महत्येविषयीच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभानसभेत मांडल्या होत्या मात्र मुंबई APMC मार्केट मध्ये व्यपाऱ्याकडून शेतकऱ्यांना फसवणुकीच्या सत्र सुरु आहे यांच्या प्रत्यक्ष पाहायला मिळाले.  
गुरुवारी दुपारी मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये एका व्यपाऱ्याकडून   ज्या शेतकऱ्याला फसवणूक करण्यात आला होता त्यासाठी शेतकरी आणि व्यपाऱ्याचे   बैठक लावण्यात आला होता मात्र त्यावेळी मार्केट उपसचिव गैर हजार होते कारण मार्केट उप सचिव तत्कालीन सचिव संदीप देशमुख यांच्या निरोप कार्यक्रमाच्या   सेलिब्रेशन   मध्ये व्यस्त होते त्यामुळे   भाजीपाला मार्केटच्या उप सचिव यांच्या कार्यलयात सुरक्षा कर्मचाऱ्याने त्या शेतकऱ्यांना मध्यस्ती केल्याची फोटो तम्ही पाहू शकता अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यापेक्षा निरोपाचे सेलिब्रेशन महत्वाचं होतं का असे प्रश्न उपस्थित होत आहे .
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मध्ये   एका व्यपाऱ्याना आपल्या पाठवण्यात आलेल्या शेतमालाची थकीत पैसे साठी २००० किलोमीटर मधून आलेल्या शेतकरीला   न्याय देण्यासाठी भाजीपाला मार्केटचे उप सचिव उपस्थित नव्हते आणि त्यांचे   जागे सुरक्षा कर्मचारी कारभार सांभाळताना दिसत आहे .उप सचिव नसल्याने आलेल्या त्या शेतकऱ्याला चर्चा करण्यासाठी मार्केटचे संचालक यांचे कर्मचारी ,सुरक्षा कर्मचारी   शेतकऱ्यांच्या बरोबर   दिसते आणि सुरक्षा कर्मचारी उभे राहून त्या शेतकऱ्याच्या कागदपत्रे आपल्या हातात घेतल्याने दिसते तसेच त्याच्या कडून आम्ही पैसे देतो म्हणून लिहून घेतले होते मात्र त्या शेतकऱ्याने साह्य केला नव्हता त्यामुळे आलेल्या शेतकऱ्यांना कसा पद्धतीने   गप्प कार्यच असे चर्चा सुरु झाली होती. मात्र अचानक पणे   APMC NEWS च्या प्रतिनिधी घटनास्थळी पोहचले त्यावेळी त्या शेतकऱ्याने वाहेर येऊन सांगितली कि मि ओडिशातुन मिर्ची A विंग च्या व्यपाऱ्याना   पाठवले होते मात्र त्या व्यपाऱ्याने जे पट्टी दिल्ली त्यामध्ये PAID करून पाठवले होते यामध्ये जे   बाजार भाव होते त्यापेक्षा कमी भावाने पट्टी   देण्यात आली   त्यामुळे भाजीपाला मार्केटच्या कामकाज उप सचिव ऐवजी सुरक्षारक्षक यांच्या अधिपत्याखाली चालत असल्याची चर्चा बाजार आवारात   सुरु आहे. नवीन येणाऱ्या सचिव यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागली आहे.