मुंबई APMCच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपत्ती व्यवस्थापन पावसात गेल्या वाहून!
मुंबई APMCच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपत्ती व्यवस्थापन पावसात गेल्या वाहून!
- मुंबई एपीएमसी मार्केटला येण्यापूर्वी तुमचा विमा तपासा?
- मुंबई APMCचे सभापती आणि संचालक गेले कुठे? संतप्त व्यापाऱ्यांना सवाल
- सभापती,संचालक आणि अभियंता साहेब आमच्या मार्केटच्या रस्त्याची साडेसाती संपेल कधी!  
नवी मुंबई : मुंबई आणि उपनगरात मुसळधार   पावसाने सकाळपासून हजेरी लावली आहे. मुंबईसोबत आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर वाढलाय. मुंबई, नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे, पालघर, पनवेल इत्यादी भागात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु सकाळपासून पाहायला मिळाली आहे. दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता   वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा जोर असात राहिला, तर सखल भागात पाणी भरणार त्यामुळे पालिका प्रशासनही सज्ज झालंय मात्र मुंबई APMC मार्केटमध्ये आपत्ती व्यवस्थापन कुठे पाहायला मिळाली नाही त्यामुळे बाजार घटकांनो तुम्ही मार्केटमध्ये जातात तर बिमा काढून यावे.  
मुंबई APMC धान्य आणि मसाला मार्केटमध्ये दोन वर्षांपूर्वी कांक्रीटकरण ,डांबरीकरण आणि ड्रेनेजलाईनच्या काम करण्यात आली होती या कामात जवळपास १९ कोटी रुपये खर्च करण्यात आली होती,यामध्ये सगळे महत्वाचे म्हणजे मसाला मार्केट मध्ये ७ कोटी काम करण्यात आली होती त्यामध्ये कांक्रीटचे काम झाले नव्हत.धान्य मार्केटमध्ये झालेले कामावर ६ कोटी रुपयाची निविदा काढण्यात आली आहे आणि या कामावर आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना लवकरात नेमणूक करण्यात येणार आहे. मार्केटच्या रस्ते ,ड्रेनेज आणि कांक्रीटच्या काम गेल्या ६ वर्षांपासून कूर्मगतीने सुरू आहे. ते पाहणारे अधिकारी इतके निगरगट्ट आहेत की कितीही बातम्या आली,आंदोलने केली तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. यापूर्वी प्रशासक होते आता संचालक मंडळ आले. संचालक मंडळ येऊन ३ वर्ष झाली मात्र काम शून्य. सभापती अशोक डक आणि सचिव संदीप देशमुख या अधिकाऱ्यांना तंबी दिली मात्र ते दिखावा आहे असे बाजार घटक सांगत आहे . आता पर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही त्यामुळे हे अधिकारी आणि संचालक मंडळ मस्त शेतकरी ,ग्राहक ,वयापारी आणि कामगार त्रस्त असे दिसून येत आहे असे संचालक मंडळाला लवकरात लवकर बरखास्त करून चांगलं प्रशासक नियुक्ती करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पावसाळ्यापूर्वी सभापती अशोक डक यांनी मार्केट संचालक याना घेऊन मार्केटची पाहणी करून त्याची दुरुस्तीचे आदेश दिले. परंतु रस्ते,ड्रेनेजलाईनची दुरुस्ती झालेली नाही. दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंचा निधी जातो कुठे असा प्रश्न बाजार घटक करत आहे. मसाला मार्केट,धान्य मार्केट आणि कांदा बटाटा मार्केटची दुर्दशा नजरेस पडते.या रस्त्यावरून जाणारे वाहनचालक ,वयापारी आणि माथाडी कामगार सभापती ,मार्केट संचालक आणि अभियंता बिभागावर टीका करून आमच्या मार्केटच्या रस्त्याची साडेसाती संपेल कधी,असा संताप व्यक्त करताना दिसते.