मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये त्या अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये त्या अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
उद्यानाच्या जागेवरील पत्राशेड गोडावून तोडले.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या पाच हि बाजार आवारात कोणत्या न कोणत्या प्रकारे अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहेत. मात्र आत्ता पर्यंतची हि बांधकामे , व्यापाऱ्यांकडून त्यांच्याच गाळ्यावर करण्यात आलेली आहेत. मात्र काही व्यापार्यां कडून बाजारातील मोकळ्या भूखंडांवर हि बांधकामे केली जात आहेत. आत्ता तर धान्य मार्केटमध्ये उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर झाडे कापून , पत्राशेड लावून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. अश्या बांधकामांमुळे सोइ सुविधांसाठी असलेले भूखन्ड घशात घेतले जात आहेत. विशेष म्हणजे या संदर्भात बाजार समिती कडे हि तक्रार केल्यावर या बांधकामावर कानाडोळा करण्यात आलेला होता. महापालिका तर्फे बाजार समितीच्या सचिवाला नोटीस बाजवण्यात आली होती मात्र या बांधकामाबात कुठल्याही कारवाई झाली नाही .त्यामुळे पालिकेने आज बुधवारी थेट या बांधकावर कारवाई केली आहे.
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये उद्यानासाठी असलेल्या एका भूखंडावर बाजारातील काही व्यापारी घटकांनी झाडे कापून त्याजागेवर कांक्रीट कामे केले. आणि त्याजागेवर पत्राशेड लावून काही दिवस धार्मिक कार्यक्रम करण्यात आली. बाजारसमितीने या कार्यक्रमासाठी तात्पुर्ती परवानगी दिली होती मात्र कार्यक्रम संपल्यावर जागे रिकामी झाली नाही आणि त्याजागेवर गोडावून तयार केले होते. मात्र या अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामावर बाजार समिती कडून कोणतीच कारवाई केली जात नव्हती. विशेष म्हन्जे हे अनधिकृत बांधकाम उभे राहत असताना बाजार समितीचे त्याकडे लक्ष गेले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यावर , बाजार समीतीकडे काही व्यापाऱ्यांनी तक्रार हि केली. मात्र त्या तक्रारीकडे बाजार समिती घटकांकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यामुले हा विषय पुढे महापालिकेकडे गेला. महापालिकेने याबाबत दखल घेत विनापरवानगी बांधकाम केल्याचा ठपका ठेवून बाजाराच्या सचिवांना नोटीस पाठवली .आणि हे बांधकाम नोटीस मिळाल्याच्या १५ दिवसात तोडायची सूचना आहि केली. मात्र बाजार समितीने मुदत संपली तरी काहीही कारवाई केली नाही. यामुले बाजार समिती अश्या प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.असे अनधिकृत बांधकामामुळे वाहतूक कोंडी आणि दुर्घटना होत असते. त्यामुले अखेर बुधवारी महापालिके विभाग कार्यालयाकडून या बांधकामावर तोडकी कारवाई करण्यात आली आणि उद्यानाचा भूखन्ड मोकळा करण्यात आला. हि कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पालिकेच्या वतीने फोज फाटा घेऊन ,बाजार समितीच्या आवारात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुले बाजारातील इतर अनधिकृत बांधकामाबाबत हि अशीच कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.