मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त 120 प्रकारच्या डाळीवर NAMO SALE
नवी मुंबईः मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमधील J विंग मध्ये "अक्षर एग्री कमोडिटीज" तर्फे आज नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “नमो सेल” नावाने सवलतीच्या दरात डाळ्याची विक्री ठेवलीय. या ठिकाणी जवळपास 120 प्रकारच्या डाळींवर किलोमागे 1 ते 2 रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. मूगडाळ 82 रुपयांवरून 80 रुपये, तूरडाळ 92 रुपयांवरून 90 रुपये, मसूर 72 रुपयांवरून ते 72 रुपये, उडीद डाळ 85 रुपयांवरून 83 रुपये तर चणाडाळ 55 रुपयांवरून 53 रुपये विकली जात आहे. अक्षर एग्री कमोडिटीच्या वतीने जवळपास 3 लाख 50 हजार किलो कडधान्य विकण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती कमलेश ठक्कर यांनी दिली.