नवी मुंबईमध्ये ओमीक्रॉनसह कोरोना रुग्णांचा आकडा प्रतिदिन ५००; नवी मुंबईची चिंता वाढली
नवी मुंबई महापालिका हद्दीत सध्या ओमीक्रॉन रुग्ण संख्या ६ वर पोहचली असून ५०० रुग्ण प्रतिदिन आढळून येत आहेत. मुंबई APMC मार्केटमध्ये प्रतिदिन २ ते ४ कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय प्रतिदिन रुग्णसंख्या वाढिती असल्याने बाजार घटक धास्तावले आहेत. नवी मुंबईत सध्या ऍक्टिव्ह रुग्ण १९५३ झाले आहेत. तर मात्र, यातून मृत्यू संख्या ० असल्याने पालिका आरोग्य विभागासह नागरिकांना दिलासा मिळत आहे.
तरी महापालिके तर्फे कोरोना केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. वाशी, तुर्भे आणि नेरुळ या ठिकाणी १५०० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तर १२०० प्राणवायू बेड तयार ठेवण्यात आले आहेत. तर झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोना तपासण्या वाढवण्यात आल्या आहेत. सध्या १० हजार अँटीजेन आणि आरटीपीसीआर तपासण्या सुरु असून यात वाढ करण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
एपीएमसी भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दी मुळे समूह संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बांगर यांनी उपायोजना सुरु केल्या असून बाजार आवारात कोरोना तपासण्या वाढवल्या जाणार आहेत. शिवाय कोरोना नियम न पाळणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे मास्क वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर याबाबत बाजार समिती प्रशासन आणि पालिका प्रशासनाला  आयुक्त अभिजित बांगर यांनी आदेश दिले आहेत.