जगातल्या 23 देशांमध्ये Omicron चा शिरकाव, APMC ची स्थिती काय?
ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत तब्बल 23 देशांमध्ये या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. अमेरिकेतही ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. विशेष म्हणजे कॅलिफोर्नियातील ज्या व्यक्तीला ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे, त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण या नव्या संकटापुढे कितपत तग धरेल, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 23 देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले असून या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतात अद्याप ओमिक्रॉनचा एकही रुग्ण समोर आलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी संसदेत ही माहिती दिली. मात्र नवा व्हेरिएंट भारतात प्रवेश करू नये, यासाठीच्या सर्व उपाययोजना आखल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काही संशयित कोरोना रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. बुधवारी दिल्ली विमानतळावर लंडन आणि अॅम्स्टरडॅमवरून आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांची आरटीपीसीआर तपासणी पॉझिटिव्ह आली होती. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्यांचे सँपल पाठवण्यात आले आहेत. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपाचार सुरु आहेत.
मुंबई APMC च्या पाचही मार्केटमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली सुरु आहे. कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पळाले जात नाही. मास्कचा वापर केला जात नसल्याने यापूर्वी देखील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेले APMC यावेळी देखील घातक ठरू शकते. त्यामुळे मुंबई APMC मार्केटवर प्रशासनाची नजर असून लवकरच राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन न झाल्यास लवकरच कारवाई सुरु होणार असल्याचे दिसत आहे. शिवाय १० ते ५० हजार दंडाची तरतूद या नियमावलीत असल्याने नागरिकांना नियमांचे उल्लंघन चांगलेच महागात पडणार आहे. तर कोरोनाला हरवण्यासाठी एपीएमसी घटकांनी सक्तीने कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
कॅलिफोर्नियात ओमिक्रॉन विषाणूचे संक्रमण आढळलेली व्यक्ती २२ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून आली होती. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी तिला कोरोना झाल्याचे उघडकीस आले. या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले होते, मात्र बूस्टर डोस घेतलेला नव्हता. ओमिक्रॉन विषाणूसंदर्भात अमेरिका आता नवी नियमावली जाहीर करू शकते. आज यापैकी मोठ्या निर्णयांची घोषणा होऊ शकते. दक्षिण अफ्रिकेच्या प्रवासावर आधीच निर्बंध लावण्यात आलेले आहेत. इतर देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांची कोव्हिड तपासणी करावी लागेल. तसेच लसीकरण झाले असेल, तरीही या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट अदिक संक्रामक असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. सर्वात आधी हा व्हेरिएंट आफ्रिकेत आढलून आला. त्यानंतर जगातील 23 देशांपर्यंत विषाणूचा फैलाव झालाय. कोणत्या देशात आतापर्यंत किती रुग्ण आढळले, हे पाहुयात-
दक्षिण अफ्रिका- 77 रुग्ण
यूके- 22 रुग्ण
बोत्सवाना- 19 रुग्ण
नायजेरिया- 16 रुग्ण
पोर्तुगाल- 13 रुग्ण
अमेरिका- 1 रुग्ण
ऑस्ट्रेलिया- 7 रुग्ण
ऑस्ट्रिया- 1रुग्ण
बेल्जियम – 1 रुग्ण
ब्राझील- 1 रुग्ण
कॅनडा- 6 रुग्ण
चेक रिपब्लिक- 4 रुग्ण
डेनमार्क- 4 रुग्ण
फ्रान्स- 1 रुग्ण
जर्मनी- 9 रुग्ण
हाँग काँग- 4 रुग्ण
इस्रायल- 4 रुग्ण
जापाना- 2 रुग्ण
नेदरर्लंड- 16 रुग्ण
नॉर्वे- 3 रुग्ण
सौदी अरब- 1 रुग्ण
स्पेन – 2 रुग्ण
स्वी़न- 3 रुग्ण