देशात एक कोटी १० लाख कापूस गाठींची आवक
देशात एक कोटी १० लाख कापूस गाठींची आवक
- भारतीय रुई, सुताच्या निर्यातीला चालना मिळणे शक्य
- शेतकऱ्यांकडील कापूस साठा मागील काही दिवसांत झपाट्याने   कमी झाला आहे.
नवी मुंबई : देशात एक कोटी १० लाख गाठींची आवक झाली आहे. यातच भारतीय कापूसदर व जगातील कापूसदर एकसारखे झाले आहेत. यामुळे भारतीय रुई, सुताच्या निर्यातीला चालना मिळू शकते, अशीही स्थिती तयार झाली आहे.
मागील हंगामात नाताळपर्यंत देशात सुमारे १६० लाख गाठींची आवक झाली होती. यंदा कापूस दर स्थिर नसल्याने आवक कमी राहिली आहे. तसेच उत्पादनाबाबतही वेगवेगळी स्थिती विविध भागांत आहे. मागील पंधरवड्यात राज्यात रोज १५ ते १७ हजार गाठींची आवक होत होती. ती या पंधरवड्यात वाढून प्रतिदिन ३० हजार गाठी एवढी झाली आहे..नाताळमुळे हा बाजार बंद आहे. यामुळे कापूस दर काही दिवस दबावात घेऊ शकतो.
नाताळनंतर दरांबाबत सकारात्मक हालचाली होऊ शकतात असेही स्पष्ट होत आहे .कारण देशात एकूण उत्पादनातील किमान ४० ते ४२ टक्के कापसाची बाजारात आवक झाली आहे. शेतकऱ्यांकडील कापूस साठा मागील काही दिवसांत झपाट्याने कमी झाला आहे. तसेच नाताळनंतर देशातील कापड उद्योग गतीला पुढे निर्यातीला चालना मिळू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.