पपई उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका
पपई उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका
- पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
- पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडतात
- नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
- बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांमुळं पपई बाग उध्वस्त
नवी मुंबई: राज्यात परतीच्या पावसाचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे.   नंदूरबार   जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील परतीच्या पावसानं मोठं नुकसान झालं आहे. नंदूरबार जिल्ह्यात या पावसाचा सर्वात मोठा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पपईच्या बागांमध्ये पाणी साचून राहिल्यानं पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.पपई बागांवर डवणी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकावर मोठा परिणाम झाला आहे. पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत. तर फळाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळं त्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आसल्यानं नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळं नंदूरबार जिल्ह्यातील पपई बागा उध्वस्त होण्याच्या परिस्थितीत आहेत. कृषी विभागाच्या वतीनं पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या परिसरात या रोगांच्या नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचं प्रत्यक्षिक घ्यावीत अशी अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे. नंदूरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पपईवर पडणाऱ्या विविध रोगांमुळं हैराण झाले आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या पपई संशोधक तज्ज्ञ प्राध्यापकांनी डावणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाय योजना सुचवल्या आहेत.