नवी मुंबईला अधिक सुरक्षित शहर करणार, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंनी स्वीकारला पदभार
नवी मुंबईला अधिक सुरक्षित शहर करणार, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंनी स्वीकारला पदभार
नवीन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे सुरक्षिततेचे आश्वासन…
कायद्याच्या तरतुदी नुसार व नियमांचे उल्लंघन करण्याची गया केली जाणार नाही.
राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक मिलिंद भारंबे यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची नियुक्ती झाली आहे. यावेळी त्यांनी आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य देणार असून हे शहर महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह मुलांच्याही दृष्टीने सुरक्षित आयुक्तालय बनवले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे .तसेच सायबर, गुन्हेगारी, महिला अन्याय, अंमली पदार्थ गुन्हेगारीला आळा घालणे यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे .नवी मुंबई शहरातील वाढती गुन्हेगारी,फसवणूक,ठकबाजी,बिल्डरांकडून होणारी फसवणूक ,वाहनचोरी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न यावर लक्ष घालून फोफवलेली गुन्हेगारीवर ठाच आणली जाईल अशा पध्दतीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याच्या तरतुदी नुसार व नियमांचे उल्लंघन करण्याची गया केली जाणार नाही. येत्या आठवड्यात गुन्हे आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर सर्व पोलीस ठाण्यांना भेट दिली जाईल. कर्मचा-यांच्याही अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे..