मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी घसरले
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी घसरले.
बाजारात ग्राहक नसल्याने मालाला उठाव नाहीपावसामुळे मार्केट मधील ४० टक्के माल पडून  
नवी मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भाज्यांच्या विक्री दरावर याचा परिणाम होत आहे. आज मुंबई apmc भाजीपाला मार्केट मध्ये जवळपास ७०० गाड्यांची आवक झाल्याने मालाला उठाव नाहीये   मार्केट मध्ये ४० टक्के माल पडून राहिला   आहे. काल पासून पावसाने जोर घेतल्यामुळे मार्केट मध्ये ग्राहक नसल्याने भाज्यांचे दर खाली कोसळले आहेत. काल मार्केटमध्ये भेंडी ३० दुधी ४० टमाटर ४० गाजर ६० काकडी २० फ्लावर ७२ अश्याप्रकारे अन्य भाज्यांचा भाव होता पण आज भेंडी २३ ते २५ दुधी २५ ते १८ टमाटर २० ते २४   गाजर ३० ते ३५ काकडी १७ ते २० फ्लावर २३ ते ३० या भाज्यांच्या भावात आपल्याला जवळपास ३० टक्यांचा फरक पाहायला मिळत आहे. बाजारात ग्राहक नसल्यामुळे भाज्यांचे देखील नुकसान झाले आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात भाज्यांचे दार वाढण्याची शक्यता दिसून येते.