राजेश भुसारी यांनी स्वीकारला मुंबई APMC सचीवपदाचा कारभार
राजेश भुसारी यांनी स्वीकारला मुंबई APMC सचीवपदाचा कारभार
- बाजार समितीच्या विविध कामाचा प्रदीर्घ अनुभव असणारे राजेश भुसारी यांनी आज मुंबई APMC सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला . उप सचिव प्रकाश अष्टेकर यांनी त्याचे मुंबई APMC च्या वतीने स्वागत केले .  
- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत राजेश भुसारी यांनी नवीन सचिव पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. उप सचिव प्रकाश अष्टेकर यांच्या कडून राजेश भुसारी यांनी आज   कार्यभार स्वीकारला आहे. 
- राजेश भुसारी यांनी सचिव पदाचा   कार्यभार स्वीकारल्यावर मुंबई APMC प्रशासकीय इमारतीच्या   सभागृहात सर्व अधिकारी   आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली, सर्व अधिकारी व   कर्मचार्यांना   शिस्तबद्ध आणि नियमाप्रमाणे काम करण्याचे आदेश दिले आहे. 
- राजेश भुसारी यांनी २०१७ ते २०२२ पर्यंत नागपूर बाजार समितीचा कारभार सांभाळत बाजार समितीचे उत्पन्न १४ कोटींवरून २९ कोटींवर पोहचवले. 
- बाजार समितींच्या कामाचा दांडगा अनुभव आहे.त्यामुळे मुंबई APMC मार्केट मधील प्रलंबित प्रश्न कसे सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागली आहे ,मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून पाठविण्यात येणाऱ्या शेतमालाला योग्य हमी भाव , शेतकऱ्यांची होणारी फसवणूक , मार्केटमध्ये चालेल्या अनधिकृत व्यापारामुळे उत्त्पन्न कमी ,जवळपास १५० कोटी रुपयांचा पडून राहिलेला प्रकल्प ,मार्केटमधील रस्ते , ड्रेनेजलाईनच्या कामावर झालेल्या   भ्रष्टाचार , भाजीपाला   मार्केटमध्ये बाजार समितीचे काही अधिकारी व सुरक्षा अधिकाऱ्यामुळे बाजार आवारात   होणाऱ्या   चोरी ,हत्या ,गुटखा, गांजा व   अनधिकृत व्यापाराला पाठिंबा देणाऱ्या त्या अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यावर आता तरी आळा बसविला जाईल का यावर बाजार घटकाचे लक्ष लागले आहे.