नरेंद्र पाटील यांची आर्थिक मागास विकास महामंडळावर पुनर्नियुक्ती
नरेंद्र पाटील यांची आर्थिक मागास विकास महामंडळावर पुनर्नियुक्ती
नरेंद्र पाटील पुन्हा एकदा आर्थिक मागास विकास महामंडळाची धुरा सांभाळण्यास सज्ज
नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर पुनर्नियुक्ती   झाली आहे त्यामुळे माथाडी कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे . अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदी पुर्ननियुक्ती करून या पदाला मंत्री पदाचा दर्जा दिला आहे. 
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी असताना देवेंद्रजी फडणीससाहेब यांनी सन 2018 मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्जीवित करून या महामंडळाच्या अध्यक्ष पदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नेमणुक केली होती व या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला होता. राज्य शासनाने नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर अध्यक्षपदी पुर्ननियुक्ती केल्याने तमाम माथाडी कामगार व मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
अण्णासाहेबांच्या नांवे असलेल्या महामंडळाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्यासाठी पुन्हा मिळालेली संधी हे पुर्वी केलेल्या कार्याची पोचपावती आहे. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देणे तसेच मराठा समाजातील वंचित व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उद्यमशील तरूण तरूणींना महामंडळामार्फत मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन लाखो मराठा उद्योजक निर्माण करणे हा एकच उद्देश असेल असे मत महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आणि महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले.