वाचा पाण्याचे आश्चर्यचकित फायदे
थंडीच्या दिवसात कोमट पाणी पिणे आरोग्याला चांगले असतेच मात्र, सलग तीन महिने दररोज किमान ३ ग्लास गरम पाणी पिण्याचा प्रयत्न केल्याने अनेक फायदे झाल्याचे समोर आले आहे. वजन कमी करणाऱ्या लोकांना वजन कमी करण्यास फायदा होता शिवाय थकवा सुद्धा जाणवत नाही. गरम पाण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते. यामुळेच आपले शरीर अधिक स्वच्छ आणि ताजे राहण्यास मदत होते. गरम पाणी हाडे आणि स्नायूं चांगले ठेवते. हिवाळ्यात तर हाडांच्या जास्त समस्या निर्माण होतात. मग अशावेळी तर गरम पाणी पिणे अधिक फायदेशीर होते.
केस आणि त्वचेसाठी गरम पाणी खूप चांगले आहे. हलके गरम पाणी केस आणि त्वचा चमकदार करते. विशेष म्हणजे गरम पाणी पिल्यामुळे केस गळतीची समस्या देखील कमी होते. गरम पाणी शरीरातील खराब पदार्थ बाहेर टाकते आणि शरीर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. तसेच गरम पाणी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)