खतांच्या वाढत्या किमतीने शेतकरी हैराण; पिकांची अदलाबदली होऊ शकतो पर्याय
अनेक अस्मानी संकटांनी शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. कोरोना, अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळे याचा सामना करून शेतकरी पुरता उध्वस्थ झाला आहे. तर आता खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतकर्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. शिवाय पुढील वर्षात किमती आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. परंतू या वर्षाच्या सुरवातीला तरी खतांच्या किंमती कमी होतील असे शेतकऱ्यांना वाटते .
खताच्या किमती गेल्या वर्षभरात दुप्पट झाल्याने आता एकच पिकावर अवलंबून असणे कठीण आहे. वेगवेगळी पिके घेणे गरजेचे असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. तर पोल्ट्रीफॉर्म खत शेतात वापरण्यास शेतकरी इच्छुक आहे. मातीतील सुपीकता आणि सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी कचरा सुद्धा एक उत्तम स्थानिक पर्याय आहे. तरीसुद्धा पिकात बदल करणे हा खत महागाईवर तोडगा असल्याचे मत शेतकऱ्यांचे निर्माण झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फोरिक ऍसिड, अमोनिया आदींच्या वाढत्या किमतींमुळे खतांच्या किमतीत वाढ होत असल्याची चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढल्या असूनही शेतकऱ्यांना जुन्या दराने खते मिळावीत यावर सरकार प्रयत्न करत आहे असे एका निवेदनात म्हटले आहे.