बाजार समिती आणि शेतकऱ्यांसाठी कसे होते २०२१ तर कसे असेल २०२२ पहा स्पेशल रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी २०२१ मध्ये फार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. काय आहेत. हे निर्णय २०२२ या वर्षात बाजार समिती आणि  शेतकऱ्यांना ठरतील का फायदेशीर!
सध्या देशात महाराष्ट्र राज्याचा शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रथम क्रमांक लागतो. त्यात अधिकांश शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठ्या उपाययोजना करण्याची गरज राज्याला सातत्याने भासत आहे. ती गरज भागवण्यासाठी २०२१ मध्ये राज्य सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायदयात बदल करण्यासाठी आणि सुधारित कायदा यावा यासाठी कमेटी काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा बाजार समित्यांमध्ये येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर इतिहासात पहिल्यांदाच येत्या ४ वर्षात दरवर्षी ५०० कोटी रुपये बाजार समित्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे  हा निधी    बाजार समित्यांच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. यात शेतकऱ्यांसाठी माल साठवणूक केंद्र, शीतगृहे उभारली जाणार आहेत. याबाबत लवकरच जीआर काढण्यात येणार असून याचा फायदा राज्यातील ३०६ बाजार समित्यांना मिळणार आहे. पणन संचालक, कार्यकारी संचालक आदी मान्यवर आणि पदाधिकारी यांचे काम पाहणार आहेत.
शिवाय राज्यात शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र ऍग्रो बिझनेस मॅनेजमेंट प्रोजेक्टवर एशियन बँक काम करत आहे. यात शेतकऱ्यांसापासून ग्राहकांपर्यंत फळ आणि भाजीपाला या शेतमालाच्या होणाऱ्या नुकसानीवर काम सुरु आहे. जवळपास १००० कोटी रुपयांची तरतूद यात केली असून मागील दोन महिन्यापासून हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. तर याला मॅग्नेट प्रॉजेक्ट म्हणून सुद्धा ओळखण्यात येत आहे. तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने यावेळी २४८ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. 
मुंबई APMC मार्केटसाच्या  २०२१ वर्षभरातील काही ठळक घडामोडी
*जानेवारी*
पांढरा  वाटाणा दर कडाडले
अनधिकृत बांधकामे जोमात
*फेब्रुवारी*
बंद, संप आणि आंदोलन
अपात्र निरक्षकामुळे अस्वच्छता
बाजार समितीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढीची सभापतींची घोषणा
बाजार समितीचा २४८ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर
नशेल्या पदार्थांसह गुटखा विक्री
एफडीए कारवाई
हापूसची दमदार एंट्री
*मार्च*
आयुक्त अभिजित बांगर यांचा पाहणी दौरा
माथाडी कामगारांच्या बंद आंदोलनात सभापतींची मध्यस्थी
मुंबई बाजार समितीमध्ये कोड घोटाळा उघड
कांदा दरात घसरण
APMC फळ मार्केटमध्ये तुंबळ हाणामारी
बाजार समिती कर्मचारी पदोन्नती रखडली
कोरोना काळात बाजार घटकांचे फ्रंटलाईनवर जोमाने कामकाज
कोरोना काळात मुंबई व उपनगरांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
*एप्रिल*
वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे APMC कर्मचाऱ्याचा मृत्यू
APMC मध्ये कोरोना अहवाल चाचण्या सुरु
बाजार घटकांच्या लसीकरणावर विचार विनिमय
मुंबई APMC सचिव पदावर सोनी यांची निवड
*मे*
कामगार दिनी माथाडी कामगारांचे आंदोलन
वीरा फाउंडेशन तर्फे मोफत मास्क वाटप
माथाडी कामगारांना पाठिंबा देण्यासाठी प्रवीण दरेकर नवी मुंबईत
मुंबई APMC मार्केटमध्ये लसीकरणाला सुरुवात
मान्सूनपूर्व कामे अर्धवट
जुन्नर हापसूची दमदार एंट्री
सचिव अनिल चव्हाण यांची बदली त्यांच्या बादलीने कर्मचारी भावूक
*जून*
बाजार समिती कर्मचाऱ्यांना ७ वेतन आयोग मिळण्यासाठी धडपडणारा अधिकारी निवृत्त
यंदा हि मार्केट पुन्हा पाण्यात
*जुलै*
APMC भाजीपाला मार्केटमध्ये वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक
मार्केटमधील लसीकरणला ब्रेक मोठ्या प्रमाणात लस तुटवडा
शौचालय कंत्राटदाराचा पैसे थकवून पळ
१० शौचालय सील
७ दिवसांनंतर शौचालये खुली
प्रभारी सचिवपदी संदिप देशमुख यांची निवड
भाजीपाला मार्केटची कोटींमध्ये सेस बाकी असल्याची माहिती
मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी निवृत्त
*ऑगस्ट*
विनानिविदा लाखोंचे कंत्राट
इतिहासात पहिल्यांदाच श्रावणात भाजीपाला स्वस्त
पणनमंत्री बाळासाहेब पाटलांचा APMC दौरा
मार्केटमध्ये मराठी वापरासाठी मराठी एकीकरण समितीचे आंदोलन
*सप्टेंबर*
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माथाडी कामगारांना २० हजार लसींची घोषणा
बांधकाम समिती सदस्य असून सुद्धा कामे होत नसल्याचा धान्य मार्केट संचालक निलेश वीरा यांचा आरोप
कर्करुग्णांसाठी ग्रोमा तर्फे भव्य रक्तदान शिबीर
मसाला मार्केटमधील एसबीआय बँक भाडे न देताच APMC च्या जागेतून गायब
फळ मार्केटमध्ये अनाधिकृत केली व्यापार आणि पुठ्ठा व लाकडी पेटी शेडचा विषय गाजला
*ऑक्टोबर*
अन्न सुरक्षा विभागाकडून APMC व्यापारी त्रस्त
कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापाऱ्यानेच व्यापाऱ्यांना फसवले
पणन संचालक सतीश सोनी सेवानिवृत्त
*नोव्हेंबर*
भाजीपाला मार्केटच्या कमानीवरून संभाजी ब्रिगेड आक्रमक
APMC परिसरातील मर्चंट चेंबरला आग
मर्चंट चेंबरचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलो वजनाच्या गोणींचा प्रश्न निकाली
फळ मार्केटचा मोठ्या प्रमाणात सेस बुडवला जात असल्याची चर्चा
*डिसेंबर* 
मर्चंट चेंबरवर कारवाईच्या महापालिकेकडून हालचाली सुरु
भाजीपाला मार्केटमध्ये ८०० गाडी आवक २१ वर्षानंतर पहिल्यांदाच एवढी आवक
मुंबई APMC मार्केटमध्ये पेमेंटसाठी क्यूआर कोड प्रक्रिया सुरु
मर्चंट चेंबर कडून सिडको व महापालिकेची फसवणूक झाल्याचे निष्पन्न
भाजीपाला महासंघ आणि वाटाणा व्यापारी यांच्यात वाद
इराणी सफरचंदाची आवक मात्र काश्मीर शेतकरी हैराण
ओमीक्रॉनच्या धर्तीवर APMC मार्केटमध्ये आयुक्तांच्या पाहणीची बाजार घटकांकडून मागणी