सत्तास्थापनेनंतर शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा
सत्तास्थापनेनंतर शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा
 
सातारा येथील कोरेगावाचे दोन्ही आमदार एकाच मंचावर आल्याने कामगारांमध्ये चांगलीच चर्चा
मंचावर दोघे आमदार एकत्र आल्यावर कार्यकर्तेमध्ये उत्साह
  नवी मुंबई : सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीनंतर पहिल्यांदाच सातारा येथील कोरेगांवचे दोन्ही आमदार   राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची भेट झाली.स्वर्गीय आमदार अण्णासाहेब   पाटील यांच्या जयंतीनिमित्त या दोघांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मंचावर हे दोघेही नेते एकत्र बसून चर्चा करतानाचा व्हिडीओही समोर आला (Sashikant shinde   and Mahesh shinde   together) आहे.या व्हिडीओमध्ये शशिकांत शिंदे   आणि महेश शिंदे   एकाच मंचावर उपस्थित असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे नेत्याचे भाषण सुरु असताना शशिकांत शिंदे आणि महेश शिंदेमध्ये   चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.एरव्ही एकमेकांवर घणाघाती टीका करणारे शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे   एकाच मंचवर आल्याने चक्क दोघेही हातात हात घालून एकाच कार्यक्रमात दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.तसेच इथे उपस्थित असणाऱ्या कामगारांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
रविवारी २५ सप्टेंबर रोजी मुंबई APMC   कांदा बटाटा मार्केट येथे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 89व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांच्या मेळाव्या आयोजित करण्यात आला होता. या मेळावात   अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होते.