शिंदे फडणवीस सरकारच मिशन APMC,लवकरच होणार संचालक मंडळ बरखास्त !
शिंदे फडणवीस सरकारच मिशन APMC,लवकरच   होणार संचालक मंडळ बरखास्त !  
- मेळाव्यात व्यासपीठावर तीन नेत्यांच्या गुजगोष्टी
- व्यासपीठावर चर्चा करत असताना मुख्यमंत्र्याना कागदपत्रे देण्यात आले होते
- मुंबई APMC मार्केट आपल्या ताब्यात घेण्यासाठी ब्लूप्रिंट तयार
शिंदे फडणवीस सरकारच्या   मिशन BMC   नंतर आता मिशन मुंबई APMC   सुरु झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी मुंबई apmc मार्केट मध्ये स्वर्गीय आमदार अण्णा साहेब पाटील जयंती निमित्त   माथाडी मेळावा आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील व्यासपीठावर गुजगोष्टी सुरु असल्याचे पाहायला मिळते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना व्यासपीठावर माथाडी नेते नरेंद्र पाटील   यांच्या कडून काही कागदपत्रे देण्यात आली होती त्याआधारे सध्या ब्लूप्रिंट तयार झाल्याची माहिती सूत्रांनी   दिली आहे .   मुंबई APMC मार्केट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं वर्चस्व आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील   यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कडून बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासोबतच शिंदे फडणवीस सरकार या बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळते.