धक्कादायक : मुंबई APMC भाजीपाला मार्केटच्या व्यापारी बबन झेंडे यांची अपघाती मृत्यू
धक्कादायक : मुंबई APMC भाजीपाला मार्केटच्या   व्यापारी बबन झेंडे यांची अपघाती मृत्यू
बाइकच्या धडकेत व्यापारी बबन झेंडे यांची मृत्यू
झेंडे भाजीपाला मार्केट मध्ये प्रसिद्ध व्यापारी होता.
नवी मुंबई : मुंबई APMC भाजीपाला मार्केटचे व्यापारी   बबन झेंडे   दुचाकीवरून जात असताना तुर्भे नाकावरील बाइकस्वाराने वेगाने धडक दिली .त्यात झेंडे यांचे निधन झाले असून धडक देणारा बाईकस्वार पळून गेला आहे . तुर्भे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . झेंडे मुंबई APMC भाजीपाला मार्केटचे प्रसिद्ध व्यापारी होते .
मुंबई APMC भाजीपाला मार्केट रात्री दोन   वाजता सुरु होतो त्यासाठी व्यापारी ,हमाल व ग्राहक रात्री येत असतात .बबन झेंडे रात्री तुर्भे नाक्यावरून दुचाकीवरून APMC भाजीपाला मार्केटमध्ये येत असताना   एका अज्ञात बाइकस्वाराने वेगाने धडक दिली . धडक देउन बाईकस्वार पळून गेला आणि झेंडे खाली पडला .डोक्यात मार लागल्याने त्यांना वाशी रुग्णालयात येत असताना गंभीर जखमांमुळे मृत्यू झाले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे   .