धक्कादायक : दर १० तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या !
धक्कादायक : दर १० तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या !
- २०२२ ची आकडेवारी काळीज पिळवटणारी
- मुंबई APMC मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातून आलेल्या शेतकरी प्रतिनिधींनी याकडे लक्ष द्या..
 
नवी मुंबई : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या जातात. मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तशीच आहे. ज्यांच्या जोरावर देशाची अर्थव्यवस्था चालू आहे त्यांना आत्महत्या का करावी लागत आहे? हा प्रश्न आज पुन्हा उपस्थित झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातून मुंबई APMC मध्ये आलेले संचालक   यांनी अडीच वर्षात शेरो शायरी, हॉटेल, जेवण आणि चहा या मध्ये बाजार समिती मधून लाखो रुपये खर्च केले. मात्र शेतकऱ्याच्या हितासाठी कुठल्याही निर्णय घेतले नाही .. आता या शेतकरी प्रतिनिधींचा कार्यकाळ संपलेला आहे.   त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्याने अश्या संचालकांना धडा शिकवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे..
अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याची   मालिका कायम आहे. 2022 चा शेतकरी आत्महत्येचा आकडा तर काळीज पिळवटणारा आहे.अमरावती जिल्ह्यात दर 10 तासात एक शेतकरी आपले जीवन संपवत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 365 दिवसात एकूण 321 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक   माहिती आकडेवारीत समोर आली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा आकडा जास्त मोठा आहे.
सरकारच्या योजनाचा शेतकऱ्यांना फायदा होतोय का? त्यांच्या मागण्या काय आहेत ? त्यांना कशाची गरज आहे ?   हे प्रश्न सध्या महत्वाचे आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर बाजार समिती आणि   देशाची अर्थव्यवस्था चालत   आहे त्यांच्यासाठी शासनाकडून काय सुविधा दिल्या आहेत, कोणत्या अशा कल्याणकारी योजना आणल्या जात आहेत ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवन उंचावले जाईल??... यांसारखे प्रश्न या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा उभे झाले आहेत. यासाठी कुठे ना कुठे शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत आहे.जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना या प्रकरणाशी   काही घेणे-देणे दिसत नाही.
पालकमंत्र्यांनी सहा महिन्यांपासून याबाबत अजून एकदा ही बैठक आयोजित केलेली नाही. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ज्या 321 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले त्यापैकी 82 शेतकरी आत्महत्यांचे प्रकरण हे प्रलंबित आहे. 82 प्रकरणात शासणाकडून अजूनही मदत मिळालेली नाही.यामुळे याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनो आता तुमची वेळ आली आहे..आत्महत्या करू नका ....   तुम्ही तुमचे हित बघून निर्णय घ्या आणि तुमच्या प्रतिनिधींना निवडून आणा.