नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा
नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा !!
- नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्ष निर्यातीचा पहिला कंटेनर रवाना.  
- नव्या जोमाने हंगामासाठीची तयारी सुरू.
निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली असून १२ कंटेनरमधून १६० मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीनं जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून निर्यातीचा पहिला कंटेनर रवाना झाला आहे.
द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन २०२०-२१ हंगामात तब्बल २ लाख ४६ हजार ७५ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २३०२ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. नाशिकमध्ये यंदा द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते . त्यामुळे ३७ हजार ४६५ द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली आहे. केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी नवनवीन बाजारपेठ शोधून आपल्याकडील शेतमाल जास्तीत जास्त कसा निर्यात होईल या कडे लक्ष देने आवश्यक आहे.
गुणवत्ता वाढली तरी द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात आल्याने मातीमोल भावाने द्राक्ष विक्री करण्याची वेळ उत्पादकांवर आली होती.सततचे प्रतिकूल वातावरण,वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष ऊत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावत ठेवली आहे.  
द्राक्ष निर्यात आलेख
२०१७-१८ -१८८२२१ मॅट्रिक टन- १९०० करोड
२०१८-१९ -२४६१३३ मॅट्रिक टन- २३३५ करोड
२०१९-२० -१९३६९० मॅट्रिक टन- २१७७ करोड
२०२०-२१ – २४६१०७ मॅट्रिक टन- २२९८ करोड