मुंबई APMC मार्केटच्या पुनर्विकासासाठी तुरुंगात गेलेल्या बांधकाम व्यवसायीकाला काही संचालकांचे आमंत्रण!
व्यापाऱ्यांनो सावधान! इतरांची फसवणूक केलेला बांधकाम व्यवसायीक मुंबई APMC मार्केटचा विकास करण्यास इच्छुक
मुंबई APMC मार्केटचा विकास झाला पाहिजे यासाठी सर्वच बाजार घटक इच्छुक आहेत. बाजार समितीचा विकास झाल्यास बाजार घटकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळणार आहेत. परंतू स्वतःचे नुकसान करून अथवा फसवणूक होऊन विकास केला जावा अशी भावना मात्र कोणाचीही नाही.
मुंबई एपीएमसी मार्केटमधील बाजारपेठांचा विकास करण्यासाठी काही संचालकांनी शासनाची फसवणूक केलेला आणि तुरुंगात जाऊन आलेला बांधकाम व्यवसायीकाला आमंत्रण देत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा बांधकाम व्यवसायिकांकडून तुमची देखील फसवणूक होऊ शकते. शिवाय हे   बांधकाम व्यवसायिक खोट्या सातबारा प्रकरणात तुरुंगाची हवा खाऊन सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. याच बरोबर त्यांनी बेलापूर येथील भव्य   गृहनिर्माण प्रकल्प फसवणूक केलेल्या प्रकरणावर कोकण आयुक्त यांनी उंचस्तरीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनो सावधान कारण असे व्यवसायीक बाजारपेठेचा विकास करण्यासाठी आल्यास तुमची देखील फसवणूक होणार हे निश्चित आहे.
बाजार समितीचा विकास झालाच पाहिजे यात कोणतीही शंका नाही. परंतू व्यापाऱ्यांसह बाजार घटकांची फसवणूक करून हा विकास होणार असेल तर या विकासाची नक्की गरज कोणाला असा सवाल बाजार घटक करत आहेत. भाजीपाला, फळ, धान्य आणि मसाला मार्केटची पाहणी पुनर्विकासासाठी काही बांधकाम व्यवसायिकांनी केली आहे. या बाजारपेठांमधील काही व्यापारी बांधकाम व्यवसायीक आणि या क्षेत्रातील गुंतवणूकदार देखील असल्याने स्वतःच्या फायद्यासाठी अशाप्रकारचे बांधकाम व्यवसायिक बाजाराच्या पुनर्विकासासाठी आणले जात असल्याची चर्चा बाजारात सुरु आहेत. त्यामुळे अनेक व्यापारी सावध झाले असून सर्व बाजार घटक सावध भूमिका घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या बाजारपेठेत अनधिकृत बांधकाम सर्रास सुरु आहेत. या ठिकाणी अवैधरित्या परप्रांतीय लोकांना वास्तव्य करण्यासाठी या बांधकामांचा वापर केला जात आहे. त्यामुळे असे काही अवैध धंद्यांना  पाठबळ देणारे व्यापारी फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना बाजारात विकासाच्या नावाखाली घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत.