मुंबई APMC फळ मार्केटमध्ये पॅशन फ्रुटची दमदार एन्ट्री, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
मुंबई APMC   फळ मार्केटमध्ये "पॅशन फ्रुटची" दमदार एन्ट्री, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
मुंबई एपीएमसी फळ मार्केट मध्ये पॅशन फ्रुटची आवक सुरु झाली आहे. या फळाचा वापर ज्यूस, कॉकटेल, सिरप, जॅम्स आणि जेली   तयार करण्यासाठी होतो. यात फॉस्फरस, प्रोटिन, आयर्न, सोडियम, तसेच व्हिटॅमिन ए. बी.सी चा समावेश असतो. महाराष्ट्रात तुलनेने याची कमी माहिती आहे. मात्र दक्षिण प्रदेशात या फळाचा घराघरात आवडीने वेगवेगळ्या स्वरूपात वापर केला जातो. "पॅशन फ्रुट" हे फळ वेलीला येत असल्याने जागाही कमी लागते म्हणून गच्चीवरही ही वेल लावता येते. जुलै, ऑगस्ट महिन्यात या वेलीला फुलं येतात, खूप सुंदर दिसणारं हे फूल आपल्याकडे 'कृष्णकमळ' म्हणून ओळखले जाते. भारतात पंजाब व हिमाचल प्रदेशात यांची लागवड होत असून मुंबई एपीएमसी बाजारात साधारण १०० ते २०० बॉक्सची आवक होत आहे. एका बॉक्सचा दर ३०० ते ४०० रुपये विक्री होत आहे . आपल्याला हे फळ चाखायचे असल्यास आपण देखील एपीएमसी मार्केटमध्ये खरेदी करु शकता."पॅशन फ्रुट" या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब आणि मूत्राशय या सारख्या विकारांसाठी हे उपयोगी ठरते.