ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 2022 हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार
नवी मुंबई :आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये पुरुष शेतकऱ्यांच्या बरोबर महिला शेतकरी देखील खांद्याला खांदा लावून उभी असतात. तसेच काही महिलानीशेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचे उत्पादन वाढवले आहे.अशा शेतकरी महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ठाकरे सरकारने येणारे 2022 हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. आता शासनाकडून या योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना जास्तीचे सूट देण्यात येणार आहे. जसे की विविध प्रकारच्या कृषी योजना आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी 30 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे याचा फायदा असा होईल की, महिला शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे निधी तर मिळणारच आहे पण नवीन उद्योगांची उभारणी देखील करायला मदत होणार आहे. त्यामुळे महिलांना आता त्यांना स्वतःच्या मालकीचे उद्योग व्यवसाय उभे करता येणार आहेत.
शेतकऱ्यांचा काही प्रश्न आला तरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारे सोबत मिळून काम करतात. यावर्षी आलेले चक्रीवादळे, अवकाळी पाऊस तसेच हंगामी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळूनच भूमिका पार पाडतात. मध्यंतरी आलेल्या अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बाबतीतला अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे.त्याची पाहणी करून लवकरच मदत जाहीर केली जाणार आहे. अवकाळी मुळेफळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.