मुंबई APMC मार्केटचा अजबगजब कारभार,एकाच कामासाठी दोन वेळा निविदा
मुंबई APMC मार्केटचा अजबगजब कारभार,एकाच कामासाठी दोन वेळा निविदा :
- दोन्ही   निविदाचि चैकशीची मागणी
- Apmc प्रशासन व अभियंताच्या भोंगल करभार समोर 
- संबंधित ठेकेदार व प्रशासनवर करवाई करण्याची मागणी
नवी मुंबई -एकाच कामाचे दोन वेळा निविदा काढून पैसे लाटण्याचा प्रकार मुंबई Apmcत उघड झाला आहे. धान्य मार्केटमधे दोन वर्षापूर्वी रसत्याचे कांक्रीटीकरण ,डांबरीकरण व ड्रेनेज लाइन कामासाठी   १२ कोटी रुपयांची कामे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कडून करण्यात आली होती नंतर याच पूर्ण झालेल्या कामाची पुन्हा ६ कोटी रूपयची निविदा   काढण्यात आली   त्यामूले Apmc प्रशासन व मार्केट अभियंतांची   भोंगल करभार समोर आली आहे ,हा   निविदा रद्द करून झालेल्या कामाची चौकशीची मागणी जोरदार लागली आहे .
मुंबई APMC धान्य मार्केट येथील अतिरिक शॉप कम गोडाऊन इथे सर्व्हिस रस्त्यावर डांबरीकरण, A , B .C .D ब्लॉकच्या धक्क्यावर ड्रेनेज दुरुस्ती तसेच फुटपाथ करणे C ब्लॉक जवळील अपूर्ण रस्त्याची काँक्रिटीकारण कामासाठी मुंबई एपीएमसी प्रशासन कडून जवळपास   ६ कोटी ३ लाख ४९ हजार ९०० रुपयांचे निविदा २१ जुलै २०२२ रोजी वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे . सगळ्यात महत्वाचे म्हणजे या टेंडर मध्ये जी कामे काढण्यात आली आहेत तीच कामे दोन वर्षा पूर्वी कर्णयात आली होती जी कामे झाली होती   त्याच कामावर परत निविदा काढण्यात आली आहेत . त्यामुळे धान्य मार्केटच्या उप अभियंताचा बोगस कारभार समोर आला   आहे .
एकीकडे मार्केटचा उत्पन्न कमी झाला आहे तर दुसरीकडे जे काम होत आहे ते निकृष्ट   दर्जाचे असून वारंवार बाजार घटकांकडून तक्रार होत आहे मात्र दुसरीकडे अभियांत्रिकी विभागा   तर्फे झालेल्या कामावर परत निविदा काढण्यात आला आहे .बाजार समितीने   हा निविदा कोणासाठी काढली आहे बाजार घटकांसाठी या कंत्राटदारसाठी असे सवाल व्यापारी उपस्थित करत आहे . हा निविदा   रद्द करून झालेल्या कामाची चौकशीची मागणी जोरदार लागली आहे .
मुंबई एपीएमसी धान्य मार्केट मध्ये काँक्रीट ,डांबरीकरण आणि ड्रेनेजलाईन कामासाठी   वर्ष   २०१७-१८ मध्ये जवळपास १२ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते . हे टेंडर कंत्राटदार B.J   civil work ला मिळाले होते . बाजार समितीच्या तत्कालीन अधिक्षक अभियंत्याच्या   जवळील असल्यामुळे त्याला हे काम देण्यात आले होते.त्यावेळी या कंत्राटदाराच्या कामावर व्यपाऱ्यानी आक्षेप घेतला होता   तरी देखील हा कंत्राटदार आपलं काम करत होता त्याच वेळी टेंडर मध्ये दिलेले काम आणि होत असलेल्या कामामुळे बऱ्याच तफावत होत्या , तसेच या   कंत्राटदारांनी प्रपोजड कांक्रीट रस्त्यावर डांबरीकरण केले होते.  
मात्र त्यावेळी कुठल्याही प्रकाची कारवाई झाली नाही आणि त्याच कंत्रादाराने २०२१ मध्ये रस्ते कांक्रीट काम पूर्ण न करता त्यांना जवळपास 12 कोटी रुपये देण्यात आले व त्या कामाचा दोष निवारण कालावधीत   B.J   civil work कडून काम करून न घेता आता धान्य मार्केटचे उप अभियंता यांनी त्याच कामाचा   निविदा काढल्याने या मध्ये मोठा प्रमाणात भ्रस्टाचार दिसून येत आहे यावर चौक्शी करून संबधितयावर कारवाई करावी अशी मागणी बाजार घटक करत आहे
निविदेतील तरतुदिं नुसार कुठलेही काम झालेले नाही.जुन्या डांबरच्या रस्त्यावर त्या खालील खराब झालेल्या रस्त्यावर स्पेशिफिकेशन नुसार काम न करता त्यावरच डांबरीकरन केलेले आहे. गटाराचे काम ही निकृष्ट दर्जाचे केलेले आहे. व्यापारी घटकानी   एपीएमसी प्रशासनाला याबद्दल तक्रारी करून सुद्धा एपीएमसी प्रशासन यावर कोणतीही ठोस पावले उचलत नाही आम्ही वारंवार सांगून सुद्धा आमच्याकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत आहे काही व्यापाऱ्यांनी असे सांगितले की पाऊसामध्ये पाणी साचले जाते त्यामुळे आम्हाला शारीरिक त्रास सुद्धा सहन करावा लागला। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला कोट्यवधी रुपये व्यापारी शेष देतात त्या बदल बाजार समिती आम्हाला काही सोयीसुविधा देत नाही अशे प्रतिक्रिया व्यापाऱ्यानी दिली . या निकृष्ट दर्जाचे केलेले कामांची तपासणी होऊन त्या अधिकारी वर काय कारवाई करणार याचे लक्ष लागून आहे.