धक्कादायक: आईच झाली वैरीण,10 दिवसांच्या मुलीचा सौदा अडीच लाखाला
नवी मुंबईत खळबळ उडून देणारा धक्कादायक प्रकार उलवे परिसरात घडला असून जन्मदातीच वैरण निघाली आहे. पोटच्या गोळ्याचा सौदा अडीच लाखांना करणाऱ्या आई आणि ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केवळ १० दिवसांच्या मुलीची विक्री होत असताना पोलिसांनी हि कारवाई केली. नवी   मुंबईतील उलवे सेक्टर २० मध्ये एक महिला आपल्याच १० दिवसांच्या मुलीला अडीच लाखांना विकणार असल्याचे पोलिसांना समजले होते.
एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या टीमने सापळा रचला आणि मुलीच्या आईसह आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले. या लोकांकडे चौकशी केली असता रीतसर दत्तक घेण्याची कोणतीही प्रिक्रिया आढळली नसल्याने नवजात बालकांची अनधिकृरीत्या विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी या आईसह आरोपींना अटक केली. आरोपीकडून ४ मोबाईल, पॅनकार्ड आणि पन्नास हजार रुपयाचे पाच बंडल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बालक आणि आईला भिवंडीच्या बाल कल्याण समितीकडे हजर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी यावेळी सांगितले.
या कारवाईने नवजात बालकांची विक्री आणि खरेदी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नवी मुंबईत विविध रेल्वे स्टेशन बाहेर अशा नवजात बालकांची विक्री होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले असून आता अशा लोकांवर जोरदार कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारे नवजात बालकाची खरेदी विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
नवी मुंबई परिसरात संशयीत लोकांवर बिट मार्शल नजर ठेवून असणार आहेत. तसेच सोबत असलेल्या बाळाची चौकशी करून संबंधित कागदपत्रे तपासणी करण्यात येईल. तसा काही गैरप्रकार आढळल्यास कारवाई करणारे असल्याचे परिमंडळ १ उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.