मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये सुरु असलेले कामे निकृष्ट दर्जाचे, त्रयस्थ यंत्रेणेमार्फत सर्व कामाची होणार चौकशी - महादेवराव जाधव
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये सुरु असलेले   कामे निकृष्ट दर्जाचे, त्रयस्थ यंत्रेणेमार्फत सर्व कामाची होणार चौकशी - महादेवराव जाधव  
धान्य मार्केट अभियंता व कार्यकारी अभियंताचे कंत्राटदाराला पाठबळ
नकाशा आणि प्रत्येक्षात कामामध्ये तफावत
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये   सुरु असलेले रस्ताचे काम   निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर कामे बंद करून कामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी , अशी मागणी   बाजार घटकांनी   केली आहे, सध्या मार्केट मध्ये रस्तेची   कांक्रीटीकरण ,डांबरीकरण ,ड्रेनेज लाईन आणि पॅसेजच्या सिलिंग मध्ये दुरुस्ती आणि रंग -रंगोटीचे काम सुरु आहे सदर   कामे जवळपास ६ कोटीचे आहे . कामे सुरु झाल्यापासून याकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे एकीकडे बाजार समितीकडे पैसे नसल्याने मार्केटमध्ये   विकास कामे वऱ्याच वर्षांपासून रखडलेले होते आणि आता काम सुरु असताना या सर्व कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत असे व्यपाऱ्याने सांगितले .धान्य मार्केट अभियंता व कार्यकारी अभियंता   कंत्राटदाराला पाठीशी घालत असून झालेल्या कामावर चौकशी करून   कारवाई करावी असे मागणी बाजार घटकांकडून होत आहे.
धान्य मार्केटमध्ये सुरु असलेले   सर्वकामे   निकृष्ट दर्जाचे आहेत, ड्रेनेज लाईनचे काम करताना प्रॉपर लेव्हल झालेले नाही ,पाईप कांक्रीटवर न ठेवता मातीवर टाकण्यात आलेले आहे , पाइपची कॉलर जॉईंट व्यवस्थित केले नाही ,पाईपचे आजूबाजूचे कांक्रीट मध्ये व्यबस्थित भरण्यात आलेली   नाही , तसेच रस्त्यावर कांक्रीटकरण   कामासाठी   दिलेला नकाशा आणि प्रत्यक्ष कामामध्ये तफावत दिसून येत आहे , कांक्रीटच्या रस्त्यासाठी   जे खोदकाम नकाशा मध्ये आहे ते कमी दिसून आलेले आहे , जवळपास १ फुटाचे खोदकाम कमी झालेले आहे त्यामुळे १ फुटाचे दगडाचे सोलींग भरणी कमी केले आहे .यावरून असे स्पस्ट होते   रस्तेच्या काम निकृष्ट दर्जाचे चालले आहे, तसेच डांबरीकरणाचे खोदकाम चुकीचे पद्धतीने झाले आहे आणि   यामधून काढण्यात आलेली माती त्यामध्ये परत टाकून लेबलिंग करून सपाटीकरण केले   जात आहे ,त्यामुळे धान्य मार्केट मध्ये रस्ते कान्क्रीटी करणाचे काम,ड्रेनेजलाईन ,मार्केटच्या पॅसेजमध्ये झालेले सिलिंगचे काम   अत्यन्त निकृष्ट दर्जाचे होत आहे,कामाचा   ठिकाणी मार्केट अभियंता व कार्यकारी अभियंता दिसत नाही,कंत्राटदार आपल्या मर्जीप्रमाणे   काम   करत आहे,
बांधकाम समितीचे अध्यक्ष माधवराव जाधव यावर प्रतिक्रिया देताना सांगितले कि या कामाची तक्रार आमच्याकडे आलेली आहे   ,मी आणि संचालक सुधीर कोठारी यांनी सदर कामाची पाहणी दौरा केला आहे , पाहणी दौऱ्यानुसार   या सर्व कामाची त्रिसदीय यंत्रणेमार्फत चौकशी होणार आहे, अशी माहिती बांधकाम समितीचे सभापती माधवराव जाधव APMC NEWS ला दिली आहे.