देशात ओमिक्रॉनचा धोका वाढला; देशात आणि राज्यात कुठे रुग्ण जास्त वाचा सविस्तर
भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात ओमिक्रॉनचा धोका रोखायचा असेल तर कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ओमिक्रॉन वाढता वेग चिंतेचं कारण बनला आहे. देशात आतापर्यंत ७८१ ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. नवी दिल्लीत २३८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्रात १६७ रुग्ण आढळले आहेत. देशातील २१ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गातून मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या २४१ इतकी झाली आहे. देशात गेल्या चोवीस तासात ९ हजार १९५ कोरोना रुग्ण आढळले असून सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ४४.६ टक्के रुग्ण वाढले आहेत.
ओमिक्रॉनच्या सर्वाधिक बाधितांची नोंद ही नवी दिल्लीमध्ये झाली आहे. नवी दिल्लीत २३८ बाधितांची नोंद झाली असून त्यापैकी ५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर महाराष्ट्रात १६७ रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यलो अलर्ट जारी केल्याने शाळा, महाविद्यालय, सिनेमागृह आणि जीम तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुकानं, सरकारी वाहनांवर काही प्रमाणात प्रतिंबंध लावण्यात आले आहेत.
देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ७८१ वर पोहोचली असून सर्वाधिक रुग्ण नवी दिल्लीत आढळले आहेत. नवी दिल्लीत २३८, महाराष्ट्रात १६७, केरळ ६५ आणि गुजरातमध्ये ७३ रुग्ण आढळले आहेत. तेलंगणा ६२, राजस्थान ४६, कर्नाटकमध्ये ३४, तामिळनाडूमध्ये ३४, हरयाणा १२, पश्चिम बंगाल ११, मध्य प्रदेश ९, ओडिशा ८, आंध्र प्रदेश ६, उत्तराखंड ४, चंदीगड ३, जम्मू काश्मीर ३, उत्तर प्रदेश २, गोवा १, हिमाचल प्रदेश १, लडाख १ , मणिपूरमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत नोंदवली गेली आहे. मुंबई ८४, पिंपरी चिंचवड १९, पुणे जिल्हा १७, पुणे महापालिका ७, ठाणे महापालिका ७ , सातारा ५, उस्मानाबाद ५ आणि पनवेल महापालिका क्षेत्रात ५ रुग्णांची नोंद झालीय. तर, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळलेत. तर, बुलडाणा, लातूर, अकोला, अहमदनगर, वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पालघर, भिवंडीमध्ये प्रत्येकी १ रुग्णाची नोंद झाली आहे.