APMC मसाला मार्केटमध्ये लस न घेताच लसीकरण प्रमाणपत्र देणाऱ्यांचा भांडाफोड,तिघांना अटक. दोन महापालिकाचे कर्मचारी
करोनापासून बचावासाठी लसीकरण गरजेचं आहे.लोकल ट्रेन , मॉलसह अनेक ठिकाणी लसीचे दोन डोस घेतलेले असणं अनिवार्य करण्यात आलंय. लसीकरण बंधनकारक असलं तरी प्रमाणपत्र दाखवण आवश्यक आहे. परंतु अनेक जण लस घेण्यास तयार नसतात. लस न घेताच प्रमाणपत्र घेण्यासाठी ते पैसे मोजायला तयार असतात. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमधून समोर आला आहे.एपीएमसी पोलिसांनी बोगस प्रमाणपत्र तिघांना गजाआड केली आहे. विशेष म्हणजे यात दोन पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
एपीएमसी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात वयापारी ,कर्मचारी ,मापाडी आणि ग्राहक मुंबई ,ठाणे ,आणि उपनगरयुन ट्रेन आणि बसेस मध्ये प्रवेश करतात त्यासाठी त्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य होते. एपीएमसी मसाला मार्केटमध्ये कोरोनाचे लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र देत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता या टोळीचा भांडाफोड झाला याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केले आहे. व त्यांच्याकडून सात बोगस प्रमाणपत्रके जप्त केली गेली आहेत. नितीन आंनदराव शिंदे याचे एपीएमसी मसाला मार्केट मध्ये ऑनलाईन सेवा केंद्र आहेत व विराज वाक्षे व अमोल झेंडे हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमटीमध्ये कंत्राटी वाहक आहेत या तिघांनी पालिकेच्या लसीकरण केंद्रा आयडी वापरून बोगस प्रमाणपत्र तयार करत होते व हे प्रमाणपत्रक 3 हजार रुपयाला विकत होते.
नितीन शिंदे याचे एपीएमसी मसाला मार्केटमध्ये ऑनलाइन सेवा केंद्र आहे, तर विराज व अमोल हे महापालिकेच्या एनएमएमटीमध्ये कंत्राटी वाहक आहेत. त्यापैकी अमोल हा सध्या तुर्भे आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण केंद्रावर डेटा इंट्रीचे काम करत होता. नितीनच्या ऑनलाइन सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणात दोन्ही डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्रे व स्मार्ट कार्ड आढळून आली आहेत. ही प्रमाणपत्रे ठाणे , कल्याण, डोंबिवली भागातील रहिवाशांची असल्याचे समजते,
एपीएमसी परिसरातील व्यक्तीला प्रमाणपत्रे दिली जात होती. त्यासाठी नितीन याने त्याच मित्र विराजच्या मदतीने तुर्भे लसीकरण केंद्रात काम करणाऱ्या अमोलला संपर्क साधला होता. यावेळी पैशाच्या आमिषाला भुलून अमोलने पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आयडी वापरून, शासनाच्या संकेतस्थळावर बनावट नोंदी केल्या होत्या. मात्र पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात बनावट ग्राहकालादेखील त्यांनी अशाप्रकारे प्रमाणपत्र दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद आव्हाड यांनी पथक तयारी केले होते . पथकांनी तेथे जाऊन त्यांना अटक करून ताब्यात घेतले. आरोपींकडून खोटे प्रमाणपत्र देखील हस्तगत केले असून पुढील कारवाई सुरू आहे.