काम करून थकवा आलाय; मग असा करा दूर
कोरोना कालावधी अजूनही सुरु असल्याने बहुतेक कर्मचारी वर्क फ्राम होम करतात. मात्र, घरी एकाच ठिकाणी बसून काम केल्याबे थकवा अधिक येतो. तसेच काही शारीरिक कष्टानंतर देखील अधिक थकवा जाणवत असेल तर पुढील काही गोष्टी करून थकवा पळवा. कितीही आवश्यक आणि कोणतेही महत्वाचे काम असले तरी कामाच्या मध्ये थोडी विश्रांती घेणे आवश्यक आहे.
या दरम्यान तुम्ही शॉवर घेऊ शकता असे केल्यास काम करून थकवा दूर करण्यासाठी चांगला पर्याय आहे. यामुळे शरीराला अतिशय फ्रेश वाटून तुमचा मूडही चांगला होतो. शक्य झाल्यास १५ मिनिटांची झोप घेतली पाहिजे. जर तुम्हाला १५ मिनिटांची झोप घेता आली तर थकवा दूर होतो. काम करून ताण वाढला असेल डोक्याला शांतता हवी असेल तर हेड मसाज करून सुद्धा तुम्ही थकवा दूर करू शकता.