टोमॅटोचे भाव घसरले; शेतकऱ्यांना मोठा फटका
टोमॅटोचे भाव घसरले शेतकऱ्यांना मोठा फटका
टोमॅटोचा लालसरपणा झाला कमी
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत .. बाजार समितीत टोमॅटोचा भाव दोन ते चार रुपये किलो असल्याने उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले आहे. त्यामुळे टोमॅटोचा लालसरपणा कमी झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका उत्पादकांना बसला आहे. टोमॅटो हे जास्त उत्पादन देणारे पीक असल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. टोमॅटोलाही गेल्या महिन्यात चांगला भाव मिळाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर खाली आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात टोमॅटो दराने शेतकऱ्यांना मोठी साथ दिली.
त्यामुळे दिवाळीदरम्यान पुन्हा काही शेतकऱ्यांनी लागवडी केल्या. मात्र नोव्हेंबरपासून आवक कमी होऊनही दराला मोठा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.