GST विरोधात राज्यात व्यापारी आक्रमक मात्र मुंबई APMC धान्य आणि मसाला मार्केट मध्ये व्यापार सुरु
- GST विरोधात राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
- मुंबई APMC धान्य आणि मसाला मार्केट मध्ये व्यापार सुरु!
- मुंबई APMCच्या ४० टक्के व्यापारांची GST ला पाठ.
- मुंबई APMCचे व्यापारी सरकारने घेतलेल्या निर्णयाला सहमत आहेत का?
- ४० प्रतिशत व्यापाऱ्यांनी सुरू ठेवले आपले व्यवहार.
केंद्र सरकराने जीवनावश्यक वस्तूवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्याने व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या 18 जुलै पासून हा जीएसटी लावणार असल्याने त्याविरोधात आज राज्यभर व्यापा-यांनी कडकडीत बंद पाळला मात्र मुंबई APMC   धान्य आणि मसाला मार्केट मध्ये जवळपास ४० टक्के व्यपाऱ्यानी आपल्या व्यापार सुरु ठेवले दिसून आली आहे .
मुंबई एपीएमसी धान्य मार्केट व्यपाऱ्यांचे संस्था   ग्रेन, राइस अँड ऑइलसीड्स मर्चंट्स असोसिएशन (ग्रोमा) आणि चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडर्स यांनी या लाक्षणिक संपात सहभागी होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होते यावेळी राज्य आणि मुंबई मधून   व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी   ग्रोमा आणि कॅट असोसिएशनतर्फे आव्हान करण्यात आली होती कि   मार्केट मध्ये सगळे व्यापार बंद राहणार मात्र धान्य आणि मसाला मार्केट मध्ये जवळपास ४० टक्के व्यपाऱ्यानी आपल्या फायदा साठी व्यापार सुरु ठेवण्यात दिसून आले आहे  
चंदीगढ येथे जीएसटी परिषदेची   47 वी बैठक नुकतीच झाली. त्यात तांदूळ, डाळ, गहू, गव्हाचे पीठ, तृणधान्य, मखाना, राई, बार्ली, व्होट पेंड, पनीर, दही, लस्सी, ताक, मध, सेंद्रीय खत, नारळ पाणी आदी वस्तूंवर पाच टक्के जीएसटी (5% GST) लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. ही शिफारस सरकारने तातडीने स्वीकारली. त्यामुळे आता दैनंदिन वापरातील पदार्थांच्या किंमती वाढणार असून त्यामुळे महागाई   भडकण्याची भीती आहे. राज्यातील व्यापा-यांच्या संघटनांनी सातत्याने हा निर्णय रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला. परंतू सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या भावना पोहचवण्यासाठी व्यापा-यांनी आज एक दिवसीय बंद पुकारला. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता मात्र मुंबई एपीएमसी धान्य आणि मसाला मार्केट मध्ये जवळपास ४० टक्के वयापारी आपल्या व्यापार सुरु ठेऊन केंद्र सरकारच्या पाठिंबा दिल्याने समजते आहे .