अवकाळी पावसाचा फटका, APMC भाजीपाला मार्केटमध्ये दरात घसरण; वाटाणा २० तर गाजर १० रुपये प्रतिकिलो
काल पडलेल्या अवकाळी पाऊसाचा फटका मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटला देखील बसला आहे. भाजीपाला बाजारातील जवळपास ५० टक्के शेतमाल पडून असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज भाजीपाला बाजारात ४०० गाडी आवक झाली. प्रतिदिन जवळपास ६०० गाडी भाजीपाला बाजारात येतो. मात्र, आज २०० गाड्या कमी शेतमाल म्हणजेच ६० टक्केच माल येऊन सुद्धा भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. शिवाय मोठ्या प्रमाणात पडून असलेला भाजीपाला सडू लागल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यात पालेभाज्यांचे प्रमाण अधिक असून फळभाज्याहि सडू लागल्या आहेत.
तर एक दिवस आधी ५० रुपये प्रतिकिलो विकला जाणार वाटाणा २० रुपये तर २० रुपये प्रतिकिलो असलेले गाजर १० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होता. इतर भाजीपाला दर २० रुपये किलोच्या आत आहेत. बाजारात पडून राहिलेला भाजीपाला सडून जात असल्याचे चित्र बाजारात दिसत होते. त्यामुळे आज भाजीपाला बाजारात अत्यंत वाईट परिस्थिती पाहायला मिळाली. पावसामुळे मुंबईसह सभोवतालच्या परिसरातील ग्राहक बाजारात न फिरकल्याने माल पडून राहिला आहे. तर भाजीपाला दर घसरल्याने शेतकऱ्यांसह स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भावना व्यापारी के. डी. मोरे यांनी व्यक्त केली.
मुंबई APMC भाजीपाला बाजारातील भाज्यांचे दर वाटाणा २०, फ्लॉवर १०, भेंडी ५०, गाजर १०, शिमला २०, फ्लावर १२, टोमॅटो ३०, मिरची २०, कोबी १२, दुधी १०, वांगी १०, कारली १० रुपये प्रतिकिलो तर कोथिंबीर ५ आणि मेथी ५ रुपये जुडी