अवकाळी पावसाचा मुंबई APMC फळ मार्केटलाही फटका; संत्री व मोसंबीची आवक जास्त मात्र ग्राहक कमी
दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका मुंबई APMC भाजीपाला मार्केटसह फळ मार्केटलाही बसला. गेली दोन दिवसांपासून राज्यासह मुंबई उपनगरात   अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यामुळे मार्केटमध्ये ग्राहक फिरकत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या मोसंबी व संत्रा आवक वाढली असली तरी ग्राहकांअभावी मार्केटमध्ये माल पडून आहे. भाजीपाला आणि फळे नाशिवंत असल्याने पडून राहिलेल्या माल सडून व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.
सध्या फळांचे दर स्थिर असले तरी ग्राहक कमी राहिल्यास दरात घसरण होण्याची शक्यता असून मागणी कायम राहिल्यास दर टिकून राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी दिला आहे. मात्र, मागील दोन दिवसाच्या पावसामुळे पडून राहिलेली फळे खराब होऊ लागल्याचे व्यापारी सांगत आहेत.
मुंबई APMC फळ मार्केटमधील फळांचे बाजारभाव डाळिंब 120 ते 200, सफरचंद 80 ते 150, मोसंबी 35 ते 40, सिताफळ 80 ते 150 रुपये किलो, पपई 25 ते 50, कलिंगड 30 तर अननस 35 ते 40 रुपये प्रति नग विक्री होत आहे.