Uran jnpt : उरण-जेएनपीटी मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, तीन उड्डाणपूल खुले
तीन उड्डाणपूल खुले झाल्यानं उरण - JNPT मार्गावरील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. त्यामुळे अवजड वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाने ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले केले आहेत. करळ फाटा येथे प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांचं कामही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
उरण:तीन उड्डाणपूल खुले झाल्यानं उरण – जेएनपीटी मार्गावरील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. त्यामुळे अवजड वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाने ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले केले आहेत. गव्हाणफाटा येथे अवजड वाहनांमुळे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
आखणी चार उड्डाणपूल लवकरच खुले
दरम्यान करळ फाटा येथे प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांचं कामही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणखी दिलासा मिळणार आहे. वर्षभरात 4 वर्तुळाकार पूल वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जेएनपेटी आणि उरण येथून वर्षभर मोठी मालवाहतूक होत असल्यानं हा मार्ग कायमच वाहतूक कोंडीचा मार्ग बनला होता. त्यातच कित्येकवेळा कंटेनर बंद पडल्यानं वाहतूक कोंडीत जास्त वाढ होत होती. दिवसाला अंदाजे 4 लाख कंटेनरची वर्दळ या मार्गावर असते. लवकर जेएनपीटी बंदराचं विस्तारीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची ये-जा आणखी वाढणार आहे.
529 कोटींची कामं अंतिम टप्यात
या मार्गावर जवळपास 500 कोटी रुपयांची कामं वेगाने सुरू आहेत. त्यामुळे हा मार्ग आणखी वेगवान होणार आहे. सीबीडी-बेलापूर, उरण आणि पवनवेल थेट या मार्गाला जोडल्यानं प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. उड्डापुलाद्वारे अजूबाजूचे मुख्य मार्ग जोडले गेले असल्याने गोव्याला जाणंही सोपं झालं आहे. 2022 पर्यंत अनेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होणार असल्यानं भविष्यात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.