नवी मुंबईत विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात; ७२ हजार विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण
नवी मुंबई महानगरपालिके तर्फे पालिकेसह खासगी २०६ शाळांमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोरोना प्रसार थांबत नसल्याने लहान मुलांमधील कोरोनाचा धोका टाळण्यासाठी शासना तर्फे हे लसीकरण करण्यात येत आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण यात केले जाणार आहे.
३ जानेवारीपासून लसीकरण सुरू करणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यानुसार या लिसाकरण सुरुवात झाली. २००७ किंवा पूर्वी जन्म झालेल्या ७२ हजार ८२३ विद्यार्थ्याचे लसीकरण या माध्यमातून करण्यात येणार आहे.
पालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रामार्फत त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळामध्ये ३ ते १० डिसेंबर या कालावधीत लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे, त्यामुळे प्रत्येकाचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या आठवड्यात जास्तीत जास्त मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.