पणन संचालक पदावरून विकास रसाळ याना हकालपट्टी ,सह संचालक विनायक कोकरे याना अतिरिक्त कार्यभार
पणन संचालक पदावरून विकास रसाळ याना हकालपट्टी ,सह संचालक विनायक कोकरे याना अतिरिक्त कार्यभार  
नवी मुंबई :राज्यातील शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९०० उपबाजार समिती आणि सुमारे दीड लाख कोटींच्या उलाढालीचा गाडा हाकणाऱ्या आणि पणन सुधारणांची प्रभावी अंमलबजावणीसाठी जबाबदारी असलेल्या   पणन संचालनालयाच्या संचालकपदी   शिंदे फडणवीस   सरकार यांनी विकास रसाळ यांची नियुक्ती केली होती .   पणन संचालक सुनील पवार हे बुधवारी (ता. ३०) निवृत्त झाले. तत्पूर्वीच रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र एक दिवसात रसाळ याना हकालपट्टी करण्यात आली आहे यांच्या कारण विकास   रसाळवर आयकर विभागाने टाकलेले धाडीमध्ये कोट्यवधी रुपयाची मालमत्ता सापडले होते तसेच ठाणे लाचलुचपत विभागाने ज्यावेळी विकास रसाळ यांच्या ८ वर्षाच्या कामाची चौकशी केली तर धक्कादायक माहिती समोर आली होती.वर्ष २००९ नंतर   रसाळ यांच्या प्रॉपर्टी मध्ये अचानक वाढ झाल्याने निष्पन्न झाले होते. विकास रसाळ एका सामान्य कुटुंबातून आलेले असून ज्यावेळी कामाला लागले होते त्याच्या कडे फक्त २ एकर शेती होते नंतर   २००९ ते २०१७ पर्यंत रसाळकडे कोट्यवधी रुपयाची मालमत्ता सापडले . ठाणे   लाचलुचपत प्रतिबंधक   विभागाने रसाळ यांच्यावर २०८ टक्के अपसंपदेचा गुन्हा   कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल केला होता असे गंभीर गुन्हा दाखल झाल्यावर शिंदे फडणवीस सरकारने विकास रसाळ याना राज्याच्या कोट्यवधी रुपयाची उलाढाल असणाऱ्या पणन विभागाचे प्रमुख पदावर बसवले होते   मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार जागे झाली, एका दिवसात विकास रसाळ यांना हकालपट्टी करण्यात आली आणि त्याचे जागेवर पणन सह संचालक विनायक कोकरे याना अतिरिक्त कार्यभार देण्यात आली आहे.