कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी
कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी
कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावा गावात सध्या राजकारण चांगलच तापलय.. विशेषतः आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक या कट्टर विरोधकांचा मतदारसंघ असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघात 21 ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना चुरस वाढवलीय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गट पुन्हा कसे आमने-सामने आलेत पाहूया
कोल्हापूर   जिल्ह्यात आणि थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापलय.ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात   संपलेल्या जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीसाठी   येत्या 18 डिसेंबरला मतदान तर वीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे..प्रचारासाठी आता अवघे तीन ते चार दिवस राजकीय पक्ष आणि नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. निवडणूक ग्रामपंचायतचे असली तरी राजकीय पक्षांनी जिल्ह्यावर ताबा मिळवण्यासाठी चला ओढ सुरू केलीय.... विशेषतः भाजपने मित्र पक्षांना एकत्र करत तीनशेहून अधिक सरपंच करण्याचा निर्धार केलाय.
या निवडणुकीत सर्वाधिक वातावरण तापले ते आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचा एकेकाचा मतदार संघ असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघात.. दक्षिण मतदार संघातील 21 ग्रामपंचायतीची निवडणूक   सध्या होत असून यात बहुतांश ठिकाणी आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याच गटात प्रमुख लढत होतेय...याच मतदारसंघात काही ठिकाणी शिंदे घटना तर काही ठिकाणी ठाकरे गटांना देखील उमेदवार उतरवले असं असलं तरी खरी लढत मात्र महाडिक आणि पाटील गटातच   होणार आहे.
पाचगाव, कंदलगाव मोरेवाडी,उचगावं अशा मोठ्या गावात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलय. थेट सरपंच पदाच्या उमेदवारासह सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी ही प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे.. पथनाट्य, डिजिटल प्रचार, बॅनर बाजी, वैयक्तिक गाठीभेटी च्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतातहेत. त्यामुळे या गावांमधील वातावरण ढवळून निघालय. एकूणच कोल्हापूर दक्षिण मतदार संघात निवडणुका ग्रामपंचायतच्या होत खरी प्रतिष्ठा मात्र सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचीच प्रतिष्ठा पनाला लागल्याचं पाहायला मिळतय..