आम्ही पाठिंबा काढतोय, सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा; शिंदे गटाचं राज्यपालांना पत्रं
आम्ही पाठिंबा काढतोय, सरकारला बहुमत सिद्ध
करायला सांगा शिंदे गटाचं राज्यपालांना पत्रं
एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टातील याचिकेतही त्यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे, असं शिंदे गटाने याचिकेत म्हटलं आहे. कोर्टात या मुद्द्यावर सुनावणी सुरू असतानाच आता शिंदे गटाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्रं पाठवून आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे शिंदे गटाने पाठिंबा काढून घेतल्याचं पत्रं दिलं आहे. त्यामुळे राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यपाल या पत्रावर तात्काळ कार्यवाही करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगतात की कोर्टात याच मुद्द्यावर सुनावणी सुरू असल्याने कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिंदे गटाचा स्ट्राँग युक्तिवाद
मविआने बहुमत गमावलं आहे. सेनेच्या 39 आमदारांनी पाठिंबा काढला आहे. 39 आमदार हीच शिवसेना आहे, असं या याचिकेत म्हटलं आहे. त्यात के त्यांनी कुठेही आपला गट असल्याचा उल्लेख केल नाही. सत्तेसाठी मविआकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे. तो थांबवला जावा. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा दावाही शिंदे गटाने कोर्टात केला आहे.
शिवसेनेचे कोण कोण आमदार शिंदेंसोबत?
एकनाथ शिंदे
शहाजी पाटील
अब्दुल सत्तार
शंभुराज देसाई
अनिल बाबर
तानाजी सावंत
संदीपान भुमरे
चिमणराव पाटील
प्रकाश सुर्वे
भरत गोगावले
विश्वनाथ भोईर
संजय गायकवाड
प्रताप सरनाईक
राजकुमार पटेल
राजेंद्र पाटील
महेंद्र दळवी
महेंद्र थोरवे 
प्रदीप जयस्वाल 
ज्ञानराज चौगुले 
श्रीनिवास वनगा 
बालाजी कल्याणकर
महेश शिंदे
संजय रायमूलकर
शांताराम मोरे
संजय शिरसाट
गुलाबराव पाटील
प्रकाश आबिटकर
योगेश कदम
आशिष जयस्वाल
सदा सरवणकर
मंगेश कुडाळकर
दीपक केसरकर
यामिनी जाधव
लता सोनावणे
किशोरी पाटील
रमेश बोरणारे
सुहासे कांदे
बालाजी किणीकर
उदय सामंत
अपक्ष कोण कोण शिंदेंसोबत?
बच्चू कडू
राजकुमार पटेल
राजेंद्र यड्रावकर
चंद्रकांत पाटील
नरेंद्र भोंडेकर
किशोर जोरगेवार
मंजुळा गावित
विनोद अग्रवाल
गीता जैन
राज्यातील परिस्थिती काय?
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण जागा : 288
सत्ता स्थापनेसाठी किती जागांची गरज : 145 एकनाथ शिंदेंकडे सध्या किती आमदार : 48
भाजपचं संख्याबळ किती : 106
शिवसेनेचं 2019मध्ये निवडून आलेले आमदार वि: 56
शिवसेनेचे आता फुटलेले आमदार किती : 39
शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे शिवसेनेकचे आता
किती आमदार : 15
काँग्रेसकडे किती आमदार? : 44
राष्ट्रवादीकडे किती आमदार? : 55 (मलिक देशमुख
तुरुंगात असल्यामुळे सध्या 53 )
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना
असलेलं संख्याबळ : 169
शिवसेना आमदार फुटल्यामुळे महाविकास
आघाडीचं संख्याबळ किती झालं? : 121