मुंबई APMCला झालंय काय?
मुंबई APMC ला झालंय काय?
नवी मुंबई : जेव्हा बाज़ार समितीच्या कडूनच भ्रष्ट मार्गाचा अवलंब होतो, तेव्हा शेतकऱ्यांना आणी मार्केटमध्ये विकासचा   प्रश्न ऐरणीवर येतो. बाज़ार समिति   खात्यातील एक-दोन अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्ट असणे ही समजण्यासारखी बाब आहे परंतु जेव्हा बाज़ार समितिच्या संचालक आणी अभियंता विभाग   सामूहिक भ्रष्टाचाराची लागण होते, तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर बनते. मुंबई APMC त काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई APMC च्या संचालक   राजेंद्र पाटील यांनी काही दिवसापूर्वी मुंबई APMC   मार्केटमधे कोट्यवधी   रूपयाची आर्थिक ग़ैरकरभार बद्दल सगले कागदोपत्र घेऊन ED कड़े तक्रार केली आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात असतानाच आता मुंबई APMC   धान्य मार्केट मधे वर्क ऑर्डर व ई निवीदा नसताना ६ कोटी रूपयाची कामाची भूमिपूजन करण्यात आल्याचे उघडकीस आला आहे. यातून भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत संचालक राजेंद्र पाटील यांनी तक्रार करून सदर कामा बदल चौकशी करण्याची मागणी केली आहे .बाजार समितीवर ED मार्फ़त   चौकशी सुरू असली तरी असे नियोजनशून्य   भ्रष्ट अभियंतामुळे बाजार समितीच्या   यंत्रणेवर होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपामुळे जनमानसात कुजबुज सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या या बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचे   रक्षकच भक्षक बनले तर शेतकऱ्यानांनी   कोणाकडे पाहायचे. अखेर मुंबई APMC ला झालंय काय, असा गर्भित सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. नवीन येणाऱ्या सचिव राजेश भुसारी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्षय लागली आहे .