कोणते तूप चांगले; गाईचे कि म्हशीचे, वाचा सविस्तर
रोजच्या दैनंदिन जीवनातील आहारात तुपाचा वापर करून आपणअन्नपदार्थाची रुची वाढवतो. तूप खाणे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला खूप फायदेशीर असते. आयुर्वेदामध्ये सुद्धा तुपाला मोठे स्थान आहे. लोक विविध आजारांनी त्रस्त असतात. काही लोक वजन वाढावे म्हणून जेवताना तर काही वजन कमी करण्यासाठी तुपाचा त्याग करतात. तुपाचे दोन प्रकार आहेत. पिवळ तूप गाईच्या दुधापासून तर पांढर तूप म्हशीच्या दुधापासून बनते.
देशी तुपामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असतात. तसेच देशी तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. देशी तुपाचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा, केस, पचन आणि हृदयाचे आरोग्य चांगले आणि निरोगी राहते. गाई च्या तुपाच्या प्रमाणात म्हशीच्या तुपात फॅट ची प्रमाण जास्त असते. म्हशीचे तूप आपण दीर्घकाळ साठवू शकतो. म्हैशीच्या तुपाचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात. वजन वाढण्यास मदत होते आणि हृदयाच्या स्नायूंच्या क्रिया वाढविण्यास फायदेशीर असते. पांढऱ्या तुपामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी शरीरास आवश्यक असणारी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात.
जर का आपल्याला सर्दी किंवा खोकला आला तर म्हशीच्या तुपाचे सेवन करावे कारण म्हशीच्या तुपात अधिक प्रमाणात कॅलरीज असतात. म्हशीच्या तुपात अँटीएजिंग एजंट गुणधर्म असल्यामुळे व्हायरल इन्फेकॅशन पासून आपले संरक्षण होते. जर का तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला गाईच्या तुपाचे सेवन करणे गरजेचे आहे. गाईच्या तुपामध्ये A2 नावाचे प्रोटिन्स असते. गाई चे तूप हे ह्रदय आजार असलेल्या व्यक्तीसाठी खूप फायदेशीर असते. सोबतच गाई च्या तुपामध्ये प्रथिने, खनिजे, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
तसेच दिवसातून एकदा गाईच्या तुपात भात खाल्ल्यामुळे डायबिटीस सारखे आजार नाहीसे होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आपल्या शरीरासाठी गाईचे आणि म्हैशीचे तूप सुद्धा खूप उपयुक्त आहे. तज्ज्ञांच्या मते म्हैशीच्या तुपापेक्षा गाईचे तूप अधिक पोषक असते. कारण गाईच्या तुपात कॅरोटीन, व्हिटॅमिन ए असते, जे डोळे आणि आपल्या मेंदूसाठी खूप फायदेशीर असते