सोने चांदी खरेदी करताय तर दागिन्यांची शुद्धता नक्की तपासून घ्या
सोने चांदी खरेदी करताय तर दागिन्यांची शुद्धता नक्की तपासून घ्या. 
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या- चांदीच्या भावात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून येत आहे
दिवाळी काही दिवसांवर असताना सोने खरेदीसाठी   लोकं सराफा बाजाराकडे वळत आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर सोन्याचा भावात वाढ झालेली असल्याचे दिसत आहे. दरम्यान मागील आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावातही घसरण होताना दिसली, मात्र आता ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या- चांदीच्या भावात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून आली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवार ते आजपर्यंत सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,550 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,780 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 564 रुपये आहे.मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,420 रुपये आहे. 
24 कॅरेट सोन्याची किंमत 50,640 प्रति 10 ग्रॅम आहे. तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.