शेतकरी सन्मान योजनेत पुणे जिल्ह्याला ८०४ कोटी; वाचा तालुकानिहाय यादी
केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत ८०४ कोटी ३ लाख रुपये मिळाले आहेत. तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २ हजार याप्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये या योजनेत सन २०१९ पासून दरवर्षी शेतकऱ्यांना देण्यात येतात. आतापर्यंत १० हप्ते झाले आहेत. प्रत्येक हप्त्याच्या वेळची एकूण लाभार्थ्यांची संख्या वेगवेगळी आहे.
पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांची जिल्ह्यातील संख्या ५ लाख १२ हजार ४०० इतकी होती. त्यांना १०२ कोटी ७० लाख रुपये देण्यात आले. तर १० वा हप्ता मिळालेले लाभार्थी १ लाख ६९ हजार ४९९ इतके आहे. त्यांना ३२ कोटी २८ लाख रुपये देण्यात आले. मात्र अनेकांनी पैसे बँक खात्यात जमा जाहल्यानानंतर ते लगेचच काढून घेतले. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे खाते असलेल्या बँके बरोबर संपर्क साधल्यांनंतर खात्यात पैसेच नसल्याचे निदर्शनास आले. आता या खातेधारकांकडून कायदेशीरपणे पैसे वसूल करण्यात येतील अशी माहिती कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
योजनेच्या सुरुवातीनंतर झालेल्या लाभार्थींच्या तपासणीमध्ये अनेक शेतकरी प्राप्ती कर भरणारे आढळले. काहीजण प्राप्ती कर जमा करत नव्हते, मात्र अन्य कारणाने ते अपात्र झाले होते. बँक खात्यात जमा झालेले पैसे त्यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश केंद्र सरकारने राज्याला दिला.
जिल्ह्यात ३० हजार ६८० लाभार्थी अपात्र ठरले. त्यांच्याकडून २१ कोटी ४ लाख २२ हजार रुपये वसूल करायचे होते. मात्र फक्त ४ हजार ९६९ जणाकडून आतापर्यंत ४ कोटी 33 लाख ९६ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय संख्या याप्रमाणे
आंबेगाव २०६७, बारामती-३६३३. भोर-१०८३, दौंड-३३२९, हवेली- २३७५, इंदापूर-३०२४, जुन्नर-३६२५, खेड ३००२, मावळ - २००३, मुळशी १९०९, पुरंदर-२६०५, शिरुर-३२८५, वेल्हे ०७९३,
१० वा हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे
मुळशी २२२२, वेल्हे ३१९१, मावळ ३२८२, पुरंदर ५०७८, भोर ६७१४, हवेली ६८९२, आंबेगाव १५१८२, शिरूर १६९४८, इंदापूर १७५२८, खेड १८७८१, दौंड २०४८०, जुन्नर २१५७२ तर बारामती २३५४९