मुंबई APMC घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या सचिवांचा अजब गजब कारभार; निर्यात भवन आणले धोक्यात
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामे केली जात होती. त्या दरम्यान अनेक व्यापाऱ्यांकडूनच परिस्थितीचा आणि सत्तेचा गैरवापर करून हि बांधकामे करण्यात आली. या बांधकामाचा कळस कि काय म्हणून थेट निर्यातभावनाच्या इमारतीला धोक्यात आणण्याचे काम करण्यात आले. या ठिकाणी आरसीसी कॉलम आणि मुख्य भिंत तोडून शेटर बसविण्यात आले आहे. शिवाय पदपथावर अतिक्रमण करून सामन्याच्या हक्कावर गदा आणण्यात आली आहे. मात्र, निर्यात भवनांचे कोणतेही भविष्य लक्षात न घेता हा प्रकार केल्याने बाजार आवारात गोंधळ उडाला आहे.
तर या निर्यात भवनाची तोडफोड करणारे  दुसरे कोणी नसून घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे सचिव आहे. त्यामुळे या कामकाजावर प्रशासनाच्या कोणत्या व्यक्तीने आक्षेप घेतला तर आम्ही सभापतीशी बोलणे केले आहे असे सांगण्यात येते. शिवाय काही मंत्री, सभापती, पणन संचालक, पोलीस अधिकारी आणि सचिव याच्या  सोबतचे फोटो दाखवून संबंधित कर्मचारी यांची दिशाभूल करण्यात येते. मात्र या लोकांवर आत्ताच अंकुश न लावल्यास भविष्यात निर्यात इमारत आणि भाजीपाला मार्केट धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर आम्ही सभापतींची माणसं म्हणून आम्ही अशी काम करू शकतो असे थेट आव्हान हे लोक बाजार समितीला देत आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या उपद्रवी नागरिकांना देखील पाठबळ मिळत आहे. त्यामुळे सभापतींना बाजार घटक कळकळीची विनंती करत आहे कि हे लोक जर तुमच्या नावाने अशी अनिधकृत बांधकामे करत असतील तर त्यांना नक्की आवर घाला. उद्या तुमच्या नावाने हे अनेक गैरधंदे सुरु करतील असा इशारा बाजार घटक सभापतींना देत आहे.
भाजीपाला मार्केट मध्ये असलेल्या निर्यात भवनाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तुम्हाला बाहेरून हे निर्यात भवन अत्यंत सुंदर दिसेल मात्र तुम्ही जर निर्यात भवनाच्या आत मध्ये गेलात तर ते तुम्हाला नक्कीच हे दृशय पाहून असे वाटेल की तुम्ही एक्स्पोर्ट हाऊस मध्ये नाही तर तुम्ही कुठल्या तरी फेरीवाला झोन मध्ये आले आहात. या निर्यात भवनातून परदेशात भाजीपाला पॅकिंग होऊन जातो. या इमारतीत दोन्ही माळे मिळून एकूण 76 निर्यात गाळे आहेत. त्या व्यतिरिक्त  पतपेढी,    बँक आणि हॉटेल आहेत. या ठिकाणी  जवळपास    3 हजार मजुर वास्तव्य करतात.