महापालिका आणि APMC च्या अतिक्रमण विभागाची दिखावा कारवाई
त्याच टपरीत पुन्हा पाणी आणि गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरु
मुंबई APMC भाजीपाला मार्केट जवळ महानगरपालिकेचे नाव वापरून अनधिकृतपणे स्टॉल सुरु करण्यात आला होता. त्या पान टपरीत नशिले पदार्थ विक्री केली जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या पान टपरीवर महापालिका आणि एपीएमसीने संयुक्तरित्या कारवाई केली होती. मात्र, हि कारवाई एक दिखावा असल्याचे समोर आले आहे. भाजीपाला बाजारातून हि पान टपरी उचलून एमटीएनल इमारती समोर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या टपरीत पुन्हा तोच व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. याबाबत संबंधित विक्रेत्याला विचारले असता 'मुन्नाभाई का टपरी है' असे त्याने सांगितले.
त्यामुळे एवढा खर्च करून करण्यात आलेल्या कारवाईबाबत शंका उपस्थित होत आहेत. पोकलॅन मशीन, ट्रक, पोलीस फौजफाटा, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करून केवळ अर्ध्या किलोमीटरच्या आत हि टपरी ठेवली गेल्याने बाजार घटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर याबाबत महापालिका अतिक्रमण विभागाला विचारले असता APMCने कारवाई करून टपरी त्या ठिकाणी ठेवली आहे असे सांगितले. तर महापालिकेचीच कारवाई होती यात APMC प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे APMC संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.