शेतकरी म्हणून प्रेमाला विरोध; शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे सध्या खूपच अवघड होऊन बसले आहे. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या देखील करतात. असे असताना आता एका शेतकऱ्याचे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. हिंगोलीमध्ये एका शेतकऱ्याने आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी प्रेमवीराने चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे. यामुळे सध्या याची चांगलीच चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून या शेतकऱ्याने शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं असतं का? असा सवाल उपस्थित केला आहे. तुम्हाला भेटून खूप रडावं वाटत आहे. उद्धवसाहेब, तुम्ही सगळ्यांचे ऐकून घेता. त्यांचे प्रश्न सोडवता, माझं कसं काय? महाराष्ट्रावर तुमचं खूप प्रेम आहे पण आयुष्यात कधी तरी केलं असेल तर माझ्या प्रश्नाला उत्तर द्या.
प्रेम हे धन-दौलतीचे मोहताज असते का हो? मी पण कोणावर तरी प्रेम केलं, पण शेत जमीन कमी असल्याने माझ्या प्रेमाला विरोध केला असं असतं का? असा प्रश्न या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. मी ऐकलं होतं हिर रांजा, लैला-मजनू, शिरी फरहाद, सोनी महिवाल यांनी जर प्रेम केलं असेल तर मृत्यू का? प्रेमात विरह का असतो? ज्या प्रेमात विरह नसेल तर त्याचा मी धिक्कार करतो.
तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातील एका तुमचा मुलासाठी वहिनीला विचारा खरंच असं असतं का? असे त्याने म्हटले आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्याल अशी वाट पाहतो. अन्यथा या जगातून निघून जाणे व्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही, असेही त्याने म्हटले आहे.