शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला पूर्वनियोजित: ऍड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर अनुचित घटना घडू शकते याचे पत्र घटनेच्या चार दिवसा आधीच सह पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. या पत्रात सिल्वर ओकच नव्हे तर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान मातोश्री बंगला आणि वर्षा हे शासकीय निवासस्थान, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान व वांद्रे येथील निवास स्थान या ठिकाणी एस.टी. कर्मचारी करू शकतात असे नमूद केले होते. या सर्व बाबींची माहिती असताना सुद्धा पोलीस विभागाच्या चुकीने एवढी मोठी घटना घडली . या घटनेस जबाबदार असणारे सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची चौकशी करण्याऐवजी त्यांनाच सदर चौकशी समितीच्या प्रमुख पदी नियुक्त करणे ही बाब आक्षेपार्ह आहे. त्यामुळे घटनेस जबाबदार असलेले सहपोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सुद्धा एड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.