बड़ी खबर: मुंबई APMC अनाज मंडी में ट्रांसपोर्टर की दर्दनाक मौत!
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये वाहतूकदाराचा दुर्दवी मृत्यू
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये १९ मार्च रोजी घडलेल्या दुर्घटनेत विजेचा धक्का लागून एक व्यक्ती जखमी झाली होती. या व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी उपचार घेत असताना दुर्दवी मृत्यू झाला. MSEB आणि APMC यांच्या भोंगळ कारभारामुळे हा बळी गेल्याचा आरोप बाजार घटक करत आहेत. महावितरण आणि मुंबई बाजार समितीने येथील उघड्या केबलकडे दुर्लक्ष केल्याने हि दुर्घटना घडली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये असणाऱ्या व्यापारी, माथाडी कामगार आणि ग्राहकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समिती प्रशासन आणि संचालक यांच्यावर तीव्र नाराज व्यक्त केली.
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये गेली ३५ वर्षपासून वाहतूकदार म्हणून काम करणाऱ्या धीरेंद्र मारू वय ५७ यांच्या मृत्यूने बाजार समितीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मारू १९ मार्चला शौचालयाला गेले असता त्या लगत असलेल्या उघड्या वायरने त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांना उपचारासाठी वाशी, भाईंदर, घाटकोपर आणि नंतर सायन रुग्णालयात नेले होते. मात्र सायन रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा जैनम मारू यांनी दिली. धान्य मार्केटमधील एल पाकळीच्या मागे शौचालय आहे. या शौचालयाचा वापर करण्यासाठी लोक नियमित ये-जा करतात. त्यामुळे येथे आणखी घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिडकोकडून मार्केट बांधताना बांधण्यात आलेले विद्युत स्टेशन अनेक वर्षांपासून धोकादायक झाले होते. त्यात गेली ४ वर्षांपासून त्याची अधिकच दुरावस्था झाली आहे. येथील उघड्या वायर सतत उघडे असलेले विद्युत स्टेशन यामुळे येथील लोकांना नेहमीच भीतीच्या वातावरणात राहावे लागते. तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकारी यांनी येथे भेटी दिल्या आहेत. यावर गेली अडीच वर्षांपासून संचालक मंडळ निवडून आल्यावर मार्केट दौरा करण्यात आला होता. या दौऱ्यात सभापती, उपसभापती, सचिव आणि इतर संचालक यांनी पाहणी केली होती. मात्र परिस्थिती अजून बदलेली नसल्याने एक निष्पाप व्यक्तीचा येथे मृत्यू झाला आहे. तर आज जे पाकळीमध्ये आज शॉर्ट सर्किट झाल्याने मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर येथे सतत लाईट जात असल्याने येथील व्यापारी परेशान झाले आहेत.
तर हा मृत्यू झाल्यावर बाजार समितीला जाग आली असून त्यांनी विद्युत स्टेशनला पत्रा मारला आहे. मात्र हाच पत्रा आधी लावला असता तर हा जीव गेला नसता अशी भावना बाजार घटक व्यक्त करत आहेत.
या मृत्यूबाबत सामाजिक कार्यकर्ते अनार्जित चौहान यांनी संबंधित विभागावर गुन्हा दाखल करून त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्याचे मागणी पत्र MSEB कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. तसेच MSEB आणि APMC प्रशासन यांनी संयुक्तरित्या संपूर्ण बाजारातील विद्युत स्टेशन दुरुस्त करावेत अशी मागणी केली. अन्यथा आणखी जीव जाण्याची शक्यता वर्तवली आहे.