चार हेक्टरमधून लाखो रुपये कमावले; कसे ते पहा तरुणाची कमाल
कोरोनाच्या काळात दोन वर्षात अनेक तरूणांच्या नोकऱ्या गेल्याचे आपण पाहिले आहे. तसेच अजूनही अनेकांना नोकऱ्या लागलेल्या नाहीत. काही तरूणांनी आपल्या शेतीला जोडधंदा सुरू केला आहे. तसेच अनेकांनी पुर्णवेळ शेती करण्याचं धाडस देखील केलं आहे. अशाचं एका नव्या शेतक-याने ४ हेक्टर शेतातून लाखोंचं उत्पादन काढल्यानं त्याचं अमरावती जिल्ह्यात कौतुक केलं जातं आहे.
त्याने नवीनं प्रयोग करून हे उत्पादन काढल्यान अनेकांच्या भुवय्या उंचावल्या तर अनेक शेतक-यांनी त्याचं कौतुक देखील केलं आहे. पारंपारिक शेती सोडून बागायती शेती केल्यानंतर किती फायदा होतो हेही तरूणांनी राज्यातल्या अनेकांना दाखवून दिले आहे असं म्हणायला हरकत नाही. किरण इंगळे हा युवक अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथील असून त्याने वयाच्या २४ व्या वर्षी अनोखा प्रयोग केला आहे.अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथे राहणारा किरण इंगळे हा शेतकरी अवघ्या २४ वर्षाचा आहे. शेतीची आवड असल्याने किरणने १२ वी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून शेतात मेहनत घ्यायला सुरुवात केली. यावर्षी किरणने शेतात पारंपारिक पद्धतीने शेती न करता ४ हेक्टरवर पालेभाज्या पिकांची लागवड केली.
स्वत:च्या मालकीच्या शेतीत त्याने टमाटर, वांगे, संत्रा,चवळी, मिरची,गोबी,कांदा अश्या विविध पालेभाज्यांची लागवड केली आहे. यातून आतापर्यंत किराणला १० लाखांचं उत्पादन झालं आहे. यंदा किरणला २० लाखांच उत्पादन होऊ शकत असा अंदाज व्यक्त केलाय. पारंपरिक पद्धतीने शेती न करता वेगवेगळे प्रयोग शेतीत राबवल्यास शेती ही नक्कीच फायदेशीर ठरते असे मत किरणने व्यक्त केल आहे. किरण इंगळे याने महाराष्ट्रातील तरूण शेतक-यांना एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे ते कौतुकास पात्र ठरतात. तसेच त्यांनी उत्तम पीक घेतल्याने अनेक शेतक-यांनी त्यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे यापुढे अनेक शेतकरी पारंपारिक शेती करीत इतरही प्रयोग करताना दिसतील.